सवर्ण समाजाच्या मुलीशी लग्न केल्यावरून टाकरखेड्यात घर पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 05:32 PM2019-04-27T17:32:16+5:302019-04-27T17:33:04+5:30

जातीय तणाव : १५० जाणांवर गुन्हा दाखल

After getting married to the upper caste girl, she got a house in the tanker | सवर्ण समाजाच्या मुलीशी लग्न केल्यावरून टाकरखेड्यात घर पाडले

सवर्ण समाजाच्या मुलीशी लग्न केल्यावरून टाकरखेड्यात घर पाडले

Next


अमळनेर : मागासवर्गीय समाजाच्या मुलाने सवर्ण समाजाच्या मुलीशी लग्न केले म्हणून संतप्त गावकऱ्यांनी मागासवर्गीय कुटुंबाच्या घराची मोडतोड करून सामानाची लूट केली. याचबरोबर दहशत निर्माण करून बहिष्कार टाकल्याची घटना २० रोजी रात्री घडली. याप्रकरणी १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अ‍ॅट्रॉसिटीचेही कलम लावण्यात आले आहे.
या खळबळजनक घटनेबाबत माहिती अशी की, टाकरखेडा येथील आत्माराम गंगाराम पवार यांचा मुलगा संदीप ह. मु. सुरत याचे एका सवर्ण समाजातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याने त्याने तिच्याशी पळून जाऊन विवाह केला. ते कुटुंब आंबेडकर जयंतीनिमित्त गावी आले होते.२० रोजी रात्री एक ते दोनच्या सुमारास प्रल्हाद पाटील, युवराज पाटील, प्रकाश पाटील, विलास पाटील, शंतनू पाटील, युवराज देवराम पाटील, विश्वास पाटील, राजेंद्र पाटील, शांताराम पाटील, भास्कर पाटील, श्रीराम पाटील, रामचंद्र पाटील, नाना पाटील, जगदीश पाटील, धनराज पाटील, बाळू पाटील् , नामदेव पाटील, मयूर पाटील, मनोज पाटील , महेश पाटील, संदीप पाटील, अतुल पाटील, किरण पाटील , ज्ञानेश्वर पाटील , सोपान पाटील, ज्ञानेश्वर नागराज पाटील, पितांबर व इतर १५० ते २०० लोकांनी २० रोजी रात्री दीड वाजेच्या दरम्यान लाढ्या काढ्या व पेटत्या मशाली घेऊन घरात घुसून घराची तोडफोड केली व घर पाडून टाकले. त्यामुळे मागासवर्गीय समाजाच्या लोकांनी पळ काढून अमळनेर येथे फरशी रोडवर आश्रय घेतला. सदर प्रसंगी सवर्ण समाजाच्या लोकांनी दम दिला की, पुन्हा गावात पाय ठेवू नका नाहीतर तुमचा खून होईल अशा प्रकारची फिर्याद आत्माराम गंगाराम पवार यांनी दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला भादवी १४३ , १४७ , १४८, १४९ प्रमाणे दंगल , ३९५ प्रमाने लूटमार तर ४२७ प्रमाणे मालमत्तेचे ८ ते १० लाखाचे नुकसान केले म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास डीवायएसपी राजेंद्र ससाणे करीत आहे.
दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून काही तरुणांनी टाकरखेडा येथील लोकांना अमळनेर येथे महाराणा प्रताप चौकात मारहाण केलयाचे समजते. घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अमळनेर पोलीस स्टेशनला येऊन अधिकाऱ्यांना कायदेशीर मार्गाने तपास करा व निरपराध व्यक्तींना त्रास होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना दिल्या.

Web Title: After getting married to the upper caste girl, she got a house in the tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.