पदवीधर निवडणूकीनंतरच उमवित होणार सिनेटची स्थापना ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 09:39 PM2017-09-20T21:39:38+5:302017-09-20T21:45:35+5:30
उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन मंडळ, विद्या परिषद व अभ्यासमंडळाच्या प्रतिनिधींसाठीची निवडणूक प्रक्रिया संपली आहे. त्यामुळे लवकरच प्राधिक रणे गठीत करण्यात येणार आहेत. मात्र अधिसभेसाठी पाठविण्यात येणाºया पदवीधर प्रतिनिधींच्या निवडणूकीबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतरच सिनेट गठीत होवू शकणार आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२०-उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन मंडळ, विद्या परिषद व अभ्यासमंडळाच्या प्रतिनिधींसाठीची निवडणूक प्रक्रिया संपली आहे. त्यामुळे लवकरच प्राधिक रणे गठीत करण्यात येणार आहेत. मात्र अधिसभेसाठी पाठविण्यात येणाºया पदवीधर प्रतिनिधींच्या निवडणूकीबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतरच सिनेट गठीत होवू शकणार आहे.
उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या प्राधिकरणासाठीच्या प्रतिनिधींची निवड झाली असून, लवकरच प्राधिकरणांची स्थापना विद्यापीठाकडून टप्प्या-टप्प्याने केली जाण्याची शक्यता आहे. सिनेट गठीत पदवीधर गटाच्या निवडणुकीनंतर होणार असली तरी विविध अभ्यास मंडळाची फॅकल्टी तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये निवडणुकीत विजयी झालेले सदस्यांसह व कुलगुरुंकडून ६ नामनिर्देशित सदस्यांच्या बैठका घेण्यात येतील. त्यामधून अभ्यास मंडळाची फॅकल्टी तयार करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसात अभ्यासमंडळाची स्थापना होण्याचा अंदाज आहे.
विद्या परिषदेसाठी कुलपतींकडून काही सदस्यांची होणार नियुक्ती
अभ्यासमंडळाच्या स्थापनेनंतरच विद्या परिषदेची स्थापना होणार आहे. यामध्ये कुलगुरुंकडून ८ प्राचार्यांची व कुलपती म्हणजेच राज्यपालांकडून काही नामनिर्देशित सदस्यांची निवड विद्या परिषदेसाठी करण्यात येईल. राज्यातील सर्व विद्यापीठाना १ सप्टेंबर पर्यंत प्राधिकरणे स्थापना करण्याचा सूचना होत्या. मात्र काही अडचणींमुळे त्या होवू शकल्या नाही. आता ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांना प्राधिकरणे गठीत करून घ्यावी लागणार आहेत.
व्यवस्थापन व अधिसभेसाठी निकालाची प्रतिक्षा
व्यवस्थापन मंडळ व अधिभसभेसाठी पदवीधर मतदार संघातून निवडून आलेल्या सदस्य मतदान करत असतात. मात्र अद्याप पदवीधर गटातील निवडणुकीसाठीच्या मतदार याद्यांबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने विद्यापीठाकडून ही निवडणूक घेण्यात आली नाही. त्यामुळे जो पर्यंत न्यायालयाकडून काही सूचना येणार नाहीत. तो पर्यंत पदवीधर गटातील निवडणूक होवू शकणार नाही. त्यामुळे व्यवस्थापन मंडळ व अधिसभा गठीत करण्यासाठी न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. मात्र तो पर्यंत विद्यापीठ प्रशासनाकडून विद्या परिषद व अभ्यास मंडळ गठीत होण्यची शक्यता आहे.
राज्यातील अकरा विद्यापीठांमध्ये उमवि आघाडीवर
उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या प्राधिक रण गठीत करण्यासाठीच्या प्रतिनिधीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. अद्याप राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये निवडणूक कार्यक्र्रम जाहीर करण्यात आलेला नाही.त्यामुळे राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये उमविने आघाडी घेतली आहे. तसेच लवकरच विद्यापीठाकडून प्राधिकरणे देखील गठीत केली जाणार आहे. विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकांसाठी अद्याप राज्य शासनाकडून काही सूचना आलेल्या नाही. राज्य शासनाकडून काही सूचना आल्यास या निवडणूका देखील लवकर पार पाडण्याचीही उमविची तयारी आहे.