दीड हजाराच्या वाढीनंतर चांदीत पुन्हा एक हजाराने घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:21 AM2020-12-30T04:21:14+5:302020-12-30T04:21:14+5:30

जळगाव : सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी एक हजार ५०० रुपयांनी वाढ झालेल्या चांदीच्या भावात मंगळवार, २९ डिसेंबर रोजी एक ...

After an increase of one and a half thousand, silver fell again by one thousand | दीड हजाराच्या वाढीनंतर चांदीत पुन्हा एक हजाराने घसरण

दीड हजाराच्या वाढीनंतर चांदीत पुन्हा एक हजाराने घसरण

Next

जळगाव : सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी एक हजार ५०० रुपयांनी वाढ झालेल्या चांदीच्या भावात मंगळवार, २९ डिसेंबर रोजी एक हजार रुपयांनी घसरण झाली. त्यामुळ‌े चांदीचे भाव ७० हजार रुपयांवरून ६९ हजार रुपये प्रति किलोवर आले. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांनी घसरण होऊन ते ५० हजार ८०० रुपयांवर आले. सट्टाबाजारातील खरेदी-विक्री तसेच मंगळवारी डॉलरचे कमी झालेले दर यामुळे भाव कमी झाले आहेत.

गेल्या आठवड्यात चांदी थेट ७१ हजार रुपयांवर गेली होती. त्यानंतर मात्र घसरण होत ती ६८ हजार ५०० रुपयांपर्यंत आली. सोमवार, २८ डिसेंबर रोजी एक हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन चांदी ७० हजारांवर पोहोचली. मात्र मंगळवारी डॉलरचे दर ७३.५९ रुपयांवरून ७३.३७ रुपयांवर आले व चांदीच्याही भावात एक हजार रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे मंगळवारी चांदी पुन्हा ६९ हजार रुपये प्रति किलोवर आली.

सोन्याच्याही भावात सोमवारी ३०० रुपयांनी वाढ होऊन ५१ हजार २०० रुपयांवर गेलेल्या सोन्याच्या भावात मंगळवारी ४०० रुपयांनी घसरण होऊन ते ५० हजार ८०० रुपयांवर आले.

Web Title: After an increase of one and a half thousand, silver fell again by one thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.