कर्करोगाला हरविले अन् उमेदीने कार्यक्रमाला आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:26 AM2021-02-06T04:26:55+5:302021-02-06T04:26:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जागतिक कर्करोग दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गौरव समारंभ तसेच रांगोळी स्पर्धा आयोजित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जागतिक कर्करोग दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गौरव समारंभ तसेच रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वर्षभरापूर्वीच मुख कर्करोगावर मात करून वैद्यकीय सेवेत रुजू झालेल्या जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास जयकर यांची या कार्यक्रमातील उपस्थिती लक्षणीय ठरली. यावेळी अधिष्ठात डॉ. जयप्रकाश रामानंद आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
गुटखा, तंबाखू यासारख्या अमली पदार्थाना लांब ठेवले तरच आपण 'कॅन्सर'ला 'कॅन्सल' म्हणू शकतो, असे प्रतिपादन डॉ.रामानंद यांनी केले. तर डॉ. जयकर हे कर्करोगाला हरवतीलच, असा आम्हाला विश्वास होता, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण म्हणाले. यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. यू.बी. तासखेडकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. इम्रान पठाण, परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता भालेराव, अधिसेविका कविता नेतकर, जिल्हा मौखिक अधिकारी संपदा गोस्वामी उपस्थित होते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. नितीन भारती यांनी प्रस्तावना केली. सूत्रसंचालन व आभार चंद्रकांत ठाकूर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. स्वप्नजा तायडे, रुचिका साळुंखे, सामाजिक कार्यकर्ता राहुल बऱ्हाटे, समुपदेशक निशा कढरे यांनी परिश्रम घेतले.
यांचा सत्कार
यावेळी कर्करोगमुक्त झालेल्या राजमोहम्मद शिकलगर यांचा सत्कार करण्यात आला. तर रांगोळी स्पर्धेत प्रथम- अंकिता अहिरे, द्वितीय - आरती गावंडे, तृतीय - ज्ञानेश्वरी बोरकर यांनी यश मिळविले. त्यांचाही सन्मान करण्यात आला.
दोन महिन्यात दोन शस्त्रक्रिया
निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉ. विलास जयकर यांना जिभेचा कर्करोग असल्याचे २०१९ मध्ये निदान झाले होते. २३ सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांच्यावर पहिली शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर लागलीच त्यांच्या दाताच्या खालच्या भागाला सूज येत असल्याने पुन्हा त्या ठिकाणी कर्करोगाचे निदान झाले. १४ नोव्हेंबरला ही दुसरी शस्त्रक्रिया झाली. फेब्रुवारी २०२० मध्ये ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते.
फोटो कॅप्शन नं ५ सीटीआर ३१
रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करताना डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. एन.एस. चव्हाण, डॉ. विलास जयकर, डॉ. यू. बी. तासखेडकर, डॉ. इम्रान पठाण, कविता नेरकर.