अनेक वर्षांनी जमला माजी विद्यार्थ्यांचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 10:18 PM2019-11-04T22:18:34+5:302019-11-04T22:19:04+5:30
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेवच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. ‘सोनेरी क्षण’ ...
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेवच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. ‘सोनेरी क्षण’ या शिर्षकाखाली घेण्यात आलेल्या या मेळाव्यात १९९१ ते २००० या वर्षात असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या विद्यार्थ्यांनी आपला प्रेरणादायी प्रवास विषद केला. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देता वोल्क्सवॅगन कंपनीचे व्यवस्थापक विनायक श्रीखंडे यांनी विद्यार्थी जीवनातील विविध पैलूंचा उलगडा केला.
यावेळी ठाणे पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सुपडू बेलदार, लिना नेमाडे, प्रा. जयंत इंगळे, गणेश चौधरी, राहुल चौधरी आदी उपस्थित होते.
पळासखेडे मिराचे विद्यालय
पळासखेडे मिराचे येथील नि. पं. पाटील माध्यमिक विद्यालयात सन १९९५मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच पार पडला.
व्हॉटस्अपचा ग्रुपमुळे आले एकत्र
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जो तो नोकरी व्यवसायात स्थिर झाला. अभियंता असलेल्या रविंद्र नारायण पाटील यांनी आपल्या मित्रमैत्रिणींचे नंबर्स मिळवून व्हॉटस्अपचा ग्रुप बनवला.
याकामी निलीमा पाटील, ज्योती कुलकर्णी यांचेही सहकार्य लाभले. त्यामुळे या कार्यक्रमाला ९०पेक्षा जास्त मित्रमैत्रिणी उपस्थित होते. त्यावेळी असलेल्या गुरुवर्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, चाळीसगाव व अन्य खेड्यातून आलेले विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. जे विद्यार्थी शेती करत होते, छोटा मोठा व्यवसाय करत होते, त्यांचा गुरुजनांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमासाठी डब्ल्यू. एस. पाटील, डी. एल. पाटील, चंद्रकांत मोरे, एस. एस. पाटील, एस. आर. पाटील, एस. टी. पाटील, एस. सी. चौधरी, डी. पी. पाटील, विकास पाटील, ए. जी. सोनवणे, बी. ए. सोनवणे, शिक्षकेतर कर्मचारी दत्तात्रय पाटील व भरत पाटील उपस्थित होते.
सूत्रसंचालन महेश सोनार, कपिल कांबळे, आभार विनोद रामसिंग पाटील यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रकाश बिचारे, डिगंबर बिचारे, रविंद्र चौधरी, मधुकर हडप, सुनिल हडप, विजय महाले, अभय कुलकर्णी, विकास जगताप, शिवाजी हडप, दिलीप कोळी, तुषार पवार, अनिल हडप, वासुदेव सोनार, अरूण नेटके यांनी परिश्रम घेतले.
यावेळी जमलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी मनोगत व्यक्त केले.