साडे नऊ महिन्यानंतर चांदी ६५ हजारांच्या खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:20 AM2021-08-28T04:20:50+5:302021-08-28T04:20:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू आहे. शुक्रवार, २७ ऑगस्ट रोजी चांदीमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू आहे. शुक्रवार, २७ ऑगस्ट रोजी चांदीमध्ये ५०० रुपयांची घसरण होऊन ती ६४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. ९ जानेवारीनंतर चांदीचे भाव ६५ हजार रुपयांच्या खाली आहेत. सोन्याच्याही भावात शुक्रवारी ४०० रुपयांची घसरण होऊन ते ४८ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
गेल्या आठवडाभरापासून सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू आहे. तर चांदी ६५ हजार रुपयांवर स्थिर होती; मात्र शुक्रवारी त्यात ५०० रुपयांची घसरण होऊन चांदी ६४ हजार ५०० रुपयांवर आली. यापूर्वी ९ जानेवारी २०२१ रोजी चांदीत एकाच दिवसात पाच हजार ८०० रुपयांची घसरण होऊन ती ६४ हजार ५०० रुपयांवर आली होती. त्यानंतर पुन्हा ११ जानेवारी रोजी एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ६३ हजार रुपयांवर आली होती. त्यानंतर मात्र १२ जानेवारी रोजी त्यात थेट चार हजार रुपयांची वाढ झाली व चांदी ६७ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. तेव्हापासून ती ६५ हजारांच्या पुढेच होती.
या सोबतच गेल्या आठवड्याभरापासून १०० ते २०० रुपये असा किरकोळ चढ-उतार सुरू असलेल्या सोन्याच्या भावात शुक्रवारी ४०० रुपयांची घसरण होऊन ते ४८ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले.