मतदानानंतर गावागावात लागताहेत पैजा
By admin | Published: February 20, 2017 01:31 AM2017-02-20T01:31:24+5:302017-02-20T01:31:24+5:30
विजयाचे दावे-प्रतिदावे : मतपेटय़ा ठेवलेल्या स्ट्रॉगरुमबाहेर बंदोबस्त; मतमोजणीचे प्रशासनाकडून नियोजन
जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी गुरुवार 16 रोजी मतदान प्रक्रिया आटोपली. गुरुवार 23 रोजी मतमोजणी होणार आहे.गट व गणनिहाय लढतीच्या चर्चा ग्रामीण भागातील पारावर जोरदार चर्चा रंगत असून पैजाही लागत आहेत. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील. कुणाची सत्ता येईल, याबाबत पैजा लागत आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून मतपेटय़ा ठेवलेल्या ‘स्ट्राँग रुम’बाहेर पोलिसांचा जागता पहारा सुरु आहे.
उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांची नित्याची दिनचर्या
गुरुवार 16 रोजी मतदान झाल्यानंतर जिल्हा परिषद गट व गणातील उमेदवार व त्यांच्या कुटुंबियांनी शुक्रवारी घरीच थांबत कार्यकत्र्याच्या भेटीगाठी घेणे पसंत केले.
तसेच आठवडाभराच्या प्रचारानंतर आलेल्या थकव्यामुळे काही उमेदवारांनी आराम करणे पसंत केले. तर काही उमेदवारांची दिनचर्या नेहमीप्रमाणे राहिली.
प्रशासनाने केली तयारी सुरु
गुरुवारी शांततेत मतदान पार पडल्यानंतर तालुकानिहाय मतमोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. जळगाव तालुक्यातील गट व गणांसाठी झालेली मतमोजणी नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. मतमोजणीसाठी टेबल लावण्याचे तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना उभे राहण्यासाठीचे नियोजन सुरु केले आहे. येत्या दोन दिवसात या नियोजनाला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे.
मतदानानंतर ग्रामीण भागातील चावडी व चौकाचौकात आता कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. कोणत्या भागात कोणत्या उमेदवाराला जादा मतदान मिळाले ते जातीय समिकरणे, मतदानासाठी पैसे वाटपाचे सूत्र यासा:या चर्चा आता पारावर रंगत आहेत. यासा:यातून आपल्या समर्थक उमेदवारांच्या विजयाची काही पाठिराखे खात्री घेत एक हजार ते 50 हजारांर्पयत पैज लावली जात आहे. रात्री उशिरार्पयत चौकात व पारावर चर्चा रंगत आहेत.
4जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर अंतर्गत वादविवाद देखील सुरु झाले आहेत. प्रचार व जेवणावळीसाठी आपल्यासोबत राहून मतदान विरोधी पक्षाच्या उमेदवाराला केल्यामुळे अंतर्गत वाद सुरु झाले आहेत. तसेच प्रचारावेळी वैयक्तिक पातळीवर आरोप केल्यावरून देखील आरोपप्रत्यारोप सुरु झाले आहेत.
स्ट्राँग रुम बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे
मतदान झाल्यानंतर ज्या ठिकाणी मतपेटय़ा ठेवल्या आहे त्या स्ट्राँग रुमच्या बाहेर पोलिसांचा जागता पहारा ठेवण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयातील कर्मचा:यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. यासह या भागात सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहे.