भंगार दुकानांनंतर आता भुसावळात फॅन्सी व विना नंबर प्लेट दुचाकींवर पोलिसांची वक्र दृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:54 PM2021-02-17T16:54:16+5:302021-02-17T16:54:49+5:30

भंगार दुकानांनंतर आता भुसावळात फॅन्सी व विना नंबर प्लेट दुचाकींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

After scrap shops, now the police keep a close eye on fancy and unnumbered two-wheelers in Bhusawal | भंगार दुकानांनंतर आता भुसावळात फॅन्सी व विना नंबर प्लेट दुचाकींवर पोलिसांची वक्र दृष्टी

भंगार दुकानांनंतर आता भुसावळात फॅन्सी व विना नंबर प्लेट दुचाकींवर पोलिसांची वक्र दृष्टी

Next

भुसावळ : भंगाराचे दुकान व गोडाऊनवर छाप्यानंतर आता पोलिसांनी कुंटणखाना व शहरातील फॅन्सी नंबरप्लेट व विना नंबर प्लेट दुचाकीवर आपला मोर्चा वळविला आहे. शहरातील जामनेर रोड ते नाहाटा चौफुली, खडका चौफुली ते रजा टॉवर या भागात बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक पेट्रोलिंग करीत असताना रस्त्याच्या कडेला विनानंबर फॅन्सी आठ मोटारसायकली मिळून आल्याने त्या मोटारसायकल पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा केल्या आहेत. तसेच मोटरसायकल मालकांना कागदपत्र घेऊन आणण्यास सूचना दिल्या व फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्यांना त्वरित नंबर प्लेट बदलण्यास सांगितले.
विना नंबरप्लेट मोटारसायकल वाहन चालकांवर होणार कारवाई
भुसावळ शहरात गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी विनानंबर प्लेटची मोटारसायकल वापर करीत आहेत. महिलांचे मंगळसूत्र, चोरी, घडफोडी, दरोडे यासारखे गुन्हे घडत असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी दररोज विना नंबरप्लेटची मोटारसायकल वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. कारवाईस सामोरे जायचे नसेल तर आपल्या मोटारसायकलींवर नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. जेणेकरून याचा फायदा शहरातील नागरिकांसह वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी होणार आहे. जर एखाद्या परिसरात कुठली घटना घडल्यास ताबडतोब गुन्हेगारांचा मोटारसायकल नंबर टिपता येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली.  
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय भदाणे, आयज सैय्यद, पोना दीपक पाटील, उमेश पाटील, रमण सुरळकर, पोकॉ ईश्वर भालेराव, योगेश महाजन, जीवन कापडे, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, योगेश माळी अशांनी मिळून केली.

Web Title: After scrap shops, now the police keep a close eye on fancy and unnumbered two-wheelers in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.