दोन हजाराची लाच घेतांना अमळनेरात पोलिसाला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 07:18 PM2018-02-03T19:18:50+5:302018-02-03T19:27:04+5:30

अमळनेर तालुक्यातील पातोंडा बीटचे पोलीस संजय पाटील यांना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास येथील शासकीय विश्रामगृहाजवळ दोन हजाराची लाच घेतांना पकडण्यात आले

After taking a bribe of two thousand, police managed to apprehend | दोन हजाराची लाच घेतांना अमळनेरात पोलिसाला पकडले

दोन हजाराची लाच घेतांना अमळनेरात पोलिसाला पकडले

Next
ठळक मुद्देजळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली कारवाईकरारनाम्याचा स्टॅम्पपेपर पाटील यांनी स्वत: जवळ ठेऊन घेतला होता


अमळनेर : तालुक्यातील पातोंडा बीटचे पोलीस संजय श्रावण पाटील (वय ४८) यांना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास येथील शासकीय विश्रामगृहाजवळ दोन हजाराची लाच घेतांना पकडण्यात आले. जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
हरीपुरा, ता.यावल येथील तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने शनिवारी दुपारी जिल्हा परिषद विश्रामगृहाजवळील एका नाश्त्याच्या टपरीवर ही कारवाई केली
तडजोड करण्यासाठी लाचेची मागणी
तक्रारदार यांच्या मोठ्या भावाचा साखरपुडा मोडला असून मुलीच्या पक्षाने केलेल्या तक्रारी अर्जावरुन दोघा पक्षकारांना पोलीस स्टेशनला बोलावून समजोत्याचा करारनामा १०० रुपये दराच्या स्टॅम्पपेपरवर करण्यात आला होता. आणि साखरपुड्यात झालेला ५० हजाराचा खर्च देऊन तडजोड करण्यात आली होती. दरम्यान, तो करण्यात आलेला करारनाम्याचा स्टॅम्पपेपर पाटील यांनी स्वत: जवळ ठेऊन घेतला होता. तो देण्यासाठी पोलीस संजय पाटील यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी करून लाचेची ही रक्कम पंचासमक्ष स्वीकारली, आणि पथकाने त्यांना पकडले. जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक जी.एम. ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली . पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: After taking a bribe of two thousand, police managed to apprehend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस