ढेकू खु.ग्रा.पं.गैरकाराभाराबाबत पेट्रोलची बाटली घेवून ग्रामस्थाचे जि.प.प्रवेशव्दारासमोरच आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 01:35 PM2018-01-16T13:35:11+5:302018-01-16T13:35:44+5:30
अमळनेर तालुक्यातील ढेकु खु.ग्राम पंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्याचा मागणीसाठी मंगळवारी ढेकू येथील ग्रामस्थ दगाजी पाटील यांनी जि.प.च्या प्रवेशव्दारा समोर हातात पेट्रोलची बाटली घेवून आंदोलन केले. त्यांचा आंदोलनामुळे जि.प.अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच भंबेरी उडाली होती.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१६-अमळनेर तालुक्यातील ढेकु खु.ग्राम पंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्याचा मागणीसाठी मंगळवारी ढेकू येथील ग्रामस्थ दगाजी पाटील यांनी जि.प.च्या प्रवेशव्दारा समोर हातात पेट्रोलची बाटली घेवून आंदोलन केले. त्यांचा आंदोलनामुळे जि.प.अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच भंबेरी उडाली होती.
अमळनेर येथील ढेकू खु.येथे दलीत वस्ती सुधार, १३ व्या वित्त आयोगात झालेल्या गैरव्यवहारात दोषी असलेल्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, यासाठी ढेकू चे ग्रामस्थ दगाजी भाईदास पाटील यांनी जि.प.ग्रामपंचायत विभागाला अनेकदा तक्रार केली आहे. मात्र संबधितांवर कारवाई होत नसल्याने, पाटील हे मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हातात पेट्रोल ने भरलेली बाटली घेवून, जि.प.च्या प्रवेशव्दारावरच आंदोलन पुकारले. तसेच संबधितांवर कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला.
जि.प.अधिकारी लागले कामाला
पाटील यांनी आंदोलन सुरु केल्याने, जि.प.अधिकाºयांनी त्यांचा आंदोलनाची दखल घेत. त्यांची भेट घेवून आपले आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र दगाजी पाटील आंदोलनावर ठाम असल्याने ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे यांनी अमळनेर तालुक्याचे गट विकास अधिकाºयांना बोलावून घेत त्यांचाशी ढेकू खु.येथील गैरकाराभाराची माहिती घेवून संबधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.