दोन वर्षाच्या खंडानंतर कुलगुरू संशोधन योजना पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 10:45 PM2019-11-22T22:45:02+5:302019-11-22T22:45:13+5:30

संशोधकांना मिळणार प्रोत्साहन : कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाकडून १ कोटी ५० लाखाची तरतूद

 After two years break, the Vice Chancellor's research plan resumes | दोन वर्षाच्या खंडानंतर कुलगुरू संशोधन योजना पुन्हा सुरू

दोन वर्षाच्या खंडानंतर कुलगुरू संशोधन योजना पुन्हा सुरू

Next

जळगाव : तांत्रिक कारणामुळे सलग दोन वर्ष स्थगित करण्यात आलेली कुलगुरू संशोधन योजना पूर्ववत सुरू करण्यात आली असून यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून १ कोटी ५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे़ दरम्यान, संशोधक शिक्षक व कर्मचाऱ्यांकडूनही प्रस्ताव मागविण्यात आले आहेत़
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०१२-१३ पासून कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली. महाविद्यालयांमध्ये असलेल्या शिक्षकांची संशोधन करण्याची इच्छा पूर्ण व्हावी, समाजोपयोगी संशोधन तयार व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
त्यासोबतच शिक्षक नव्हे तर विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालय, मान्यता प्राप्त परिसंस्था, विद्यापीठ प्रशाळा व प्रशासकीय विभागातील शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अर्थात नॉन टिचींग स्टाफला सुध्दा या योजनेतंर्गत संशोधनाचे दालन खुले करून देण्यात आले आहे़ दरम्यान, तांत्रिक अडचणीमुळे सन २०१७-१८ व सन २०१८-१९ या दोन वर्षांसाठी योजना स्थगित करण्यात आली होती़ मात्र, नवीन शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून योजना पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

योजनेसाठी तरतूद
कुलगुरु संशोधन प्रोत्साहन योजनेत अतिशय काटेकोर पध्दतीने मूल्यमापन करून नियमावली तयार करण्यात आली आहे. दरम्यान, संशोधनासाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. यासाठी विद्यापीठाकडून यंदाच्या वर्षी शिक्षकांसाठी १ कोटी ५० लाख रूपयांची तरतूद केली असून नॉन टिचींग स्टाफसाठी ५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे़

प्रस्ताव मागविले... या संशोधन योजनेसाठी विद्यापीठाकडून संशोधन शिक्षक व नॉन टिचींग स्टाफ कर्मचाºयांकडून प्रस्ताव मागविले आहेत़ शिक्षकांसाठी १८ नोव्हेंबर ही अंतिम तारीख होती तर नॉन टिचींग स्टाफसाठी ३० नोव्हेंबर ही प्रस्ताव पाठविण्याची मुदत आहे़ दरम्यान, प्रस्ताव आल्यानंतर विद्यापीठाकडून मुलाखती घेतल्या गेल्यानंतर समिती मार्फत प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली.

Web Title:  After two years break, the Vice Chancellor's research plan resumes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.