अखेर दोन वर्षांनंतर विज्ञान रथ धावला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:02 PM2020-01-28T12:02:05+5:302020-01-28T12:02:39+5:30

मुंबईहून मागविले पार्ट्स : पुन्हा सुरु होणार विद्यापीठाकडून विज्ञानाचा प्रचार-प्रसार, तब्बल ३८ लाख रुपये आला होता त्यावेळी खर्च

After two years, the science chariot ran! | अखेर दोन वर्षांनंतर विज्ञान रथ धावला !

अखेर दोन वर्षांनंतर विज्ञान रथ धावला !

Next

जळगाव : तब्बल दोन वर्षांपासून एका गोडावूनमध्ये अडगळीत पडलेला ‘विज्ञान रथ’ दुरूस्त झाल्यानंतर सोमवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रस्त्यावर धावताना दिसला. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांना विज्ञान रथातील २४ वर्किंग मॉडेल्स पाहण्याची संधी मिळणार आहे़
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ग्रामीण आणि आदिवासी भाग येतो़ त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी विद्यापीठ व केरला स्टेट सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी म्युझिअम आणि प्रियदर्शनी तारांगण, त्रिवेंदम यांच्यात माजी कुलगुरू डॉ़ के़बी़पाटील यांच्या कार्यकाळात सामंजस्य करार करून विज्ञान रथाची निर्मिती करण्यात आली होती़ तब्बल ३८ लाख रुपए खर्च करून हा रथ तयार करण्यात आला होता़ विज्ञान रथ तयार करणारे महाराष्ट्रातलं पहिले विद्यापीठ होते़
नादुरूस्त रथ पडून
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून नादुरूस्त असलेला विज्ञान रथ हा विद्यापीठाच्या एका गोडावूनमध्ये अडगळीत पडून होता़ अनेकवेळा दुरूस्तीसाठी त्रिवेंदम येथील संस्थेशी विद्यापीठाकडून पत्रव्यवहार झाले होते़ मात्र, पाठपुराव्या अभावी दुरूस्तीचे काम रखडले होते़ अखेर ‘लोकमत’ व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेच्या पाठपुराव्यानंतर विज्ञान रथाच्या दुरूस्तीच्या हालचालीला सुरूवात झाली़
विज्ञान रथात २४ वर्र्कींग मॉडेल्स
या रथामध्ये न्यूटन कँडल्स, बॉल, पायथागोरसचा सिद्धांत, फ्लोटिंग मॅॅग्नेट, मॅग्झिमम एरिया, इमेज, लेझी ट्यूब, इलेक्ट्रो मॅग्नेट, कलर फ्लोटिंग मॅजिक, डान्सिंग रिंग्ज, जंपिंग डिस्क, ब्लॅक बॉडी रेडिएशन, कलर मिक्सिंग, मॅकेनिकल स्कॅनर, म्युच्युअल इंडक्शन, व्होरेटेक्स, मिरर इमजे, कॅलिडोस्कोप, डबल कोन रोलिंग अप हिल, टनेल, जनरेशन आॅफ इलेक्ट्रिसिटी अशा तब्बल २४ वर्र्कींग मॉडेल्सचा समावेश आहे.
मुंबईहून मागविले यंत्रांचे सूटे भाग
विज्ञान रथाच्या दुरूस्तीसाठी आवश्यक तंत्रांचे सुटे भाग हे मुंबई येथून मागविण्यात आले़ नंतर हा रथ दुरूस्त करण्यात आला़ दरम्यान, अजुनही दहा ते बारा टक्के रथातील कामे बाकी असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे़ मात्र, रथ दुरूस्ती झाल्यानंतर सोमवारी विद्यापीठ परिसरातील रस्त्यावर धावताना बघायला मिळाला़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या असून त्यातील वर्कींग मॉडेल पाहण्याची विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे़

Web Title: After two years, the science chariot ran!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव