गुजरात व हिमाचल प्रदेशातील विजयानंतर जळगाव जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 05:37 PM2017-12-18T17:37:58+5:302017-12-18T17:41:32+5:30

गुजरात व हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांच्या निकालात भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या यशानंतर चोपड्यासह जळगाव जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

After the victory of Gujarat and Himachal Pradesh, BJP activists at the Jalgaon District | गुजरात व हिमाचल प्रदेशातील विजयानंतर जळगाव जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

गुजरात व हिमाचल प्रदेशातील विजयानंतर जळगाव जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

Next
ठळक मुद्देभाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला आनंद व्यक्तभाजपा कार्यकर्त्यांनी एकमेकांना भरविले पेढेमहापुरुषांच्या पुतळ्यांना केले अभिवादन

आॅनलाईन लोकमत
चोपडा , दि.१८ : गुजरात व हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांच्या निकालात भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या यशानंतर चोपड्यासह जळगाव जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
चोपड्याचे शहराध्यक्ष नरेंद्र्र पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर कार्यकर्ते वाजत गाजत, घोषणा देत गेले. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते तिलक शहा, जिल्हा उपाध्यक्ष ताराबाई पाटील, कमलबाई चौधरी, सूतगिरणी रंजना नेवे, नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, महिला आघाडी शहराध्यक्षा ललिता सोनगिरे, सरचिटणीस नितीन माळी, दीपक बाविस्कर, डॉ.नरेंद्र अग्रवाल, भाजयुमो शहराध्यक्ष तुषार पाठक, ओबीसी सेल अध्यक्ष डॉ.आशिष पाटील, मुख्यमंत्री मित्र प्रकाश पाटील, दिलीप पाटील, प्रकाश पाटील, सुनील सोनगीरे, पंकज पाटील, सुरेश चौधरी, प्रकाश पाटील, गोपाल पाटील, भुषण महाजन, हेमंत जोहरी, कैलास पाटील, विक्की अहिरे, योगेश बडगुजर, विजय पाटील, विशाल पाटील, विशाल भोई, यश शर्मा, वर्षा धनगर, अनिता महाजन, रवींद्र मराठे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जळगावात आमदार सुरेश भोळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुजरात व हिमाचलप्रदेशातील विजयाचा जल्लोष केला.

Web Title: After the victory of Gujarat and Himachal Pradesh, BJP activists at the Jalgaon District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.