आषाढी एकादशीनिमित्त दुपारी रथोत्सव उत्साहात पार
By admin | Published: July 15, 2016 06:09 PM2016-07-15T18:09:39+5:302016-07-15T18:14:00+5:30
विठ्ठल मंदिर संस्थान व वाणी पंच मंडळाच्यावतीने प्रतिपंढरपूर पिंप्राळा येथे शुक्रवारी आषाढी एकादशीनिमित्त दुपारी रथोत्सव उत्साहात पार पडला.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 15 - विठ्ठल मंदिर संस्थान व वाणी पंच मंडळाच्यावतीने प्रतिपंढरपूर पिंप्राळा येथे शुक्रवारी आषाढी एकादशीनिमित्त दुपारी रथोत्सव उत्साहात पार पडला. या वेळी प्रिंप्राळानगरी विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमली होती. रथोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. रथाचे यंदाचे १४१ वे वर्ष होते.
राकेश उमाकांत वाणी यांच्या हस्ते अभिषेक होऊन पांडुरंग स्वरुप श्री बाळकृष्णाची मूर्ती रथामध्ये ठेवण्यात आली होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, साधना महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर नितीन लढ्ढा यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार सुरेश भोळे, उपमहापौर ललित कोल्हे, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, स्थायी समिती सभापती नितीन बरडे, खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेशदादा जैन, जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, संचालक दादा नेवे, माजी महापौर विष्णू भंगाळे, पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले, भाजपाचे गटनेते डॉ. अश्विन सोनवणे, पोलीस पाटील, प्रभाकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अशोक शिंदे आदी मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या घोषात रथाला सुरुवात झाली. जुनी चावडी, कुंभारवाडा, कोळीवाडा, मढी चौक, धनगर वाडा, महाराणा प्रताप चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, केशरीनंदन हनुमान चौक यामार्गे रथ पुन्हा जुनी चावडी येथे पोहचला. रथावर दोन घोडे, सारथी म्हणून अर्जुन, हनुमान यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या तर रथाच्या पुढे भजनी मंडळे व लेझीम पथके होती.
मोगरीवाले त्र्यंबक पाटील, पुरुषोत्तम सोमाणी, चिंधा बारी, माधव महाजन, जीवन पाटील, शिवाजी कुंभार, सोनू कोळी यांच्यासह इतर भाविक तसेच भजनी मंडळ सदस्यांचा गंध लावून व नारळ उपरणे देऊन सत्कार झाला.