पुन्हा नवीन ७५ कोरोना बाधित रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 06:30 PM2020-06-14T18:30:31+5:302020-06-14T18:30:41+5:30
जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ दिवसागणित कोरोना लागण झालेल्या रूग्णांचा आकडा हा वाढत ...
जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ दिवसागणित कोरोना लागण झालेल्या रूग्णांचा आकडा हा वाढत असून परिस्थिती आवाक्यात आणत असताना प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. शुक्रवार नंतर पुन्हा शनिवारी नवीन ७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहर १५, रावेर, पारोळा प्रत्येकी १०, एरंडोल ०८, भुसावळ, अमळनेर प्रत्येकी ०६, धरणगाव ०४, यावल, पाचोरा, जामनेर प्रत्येकी ०३,जळगाव ग्रामीण, बोदवड, इतर जिल्ह्यातील प्रत्येकी ०२ तसेच चाळीसगाव ०१ रूग्णांचा रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १७२८ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
अशी आहे बाधितांची संख्या
जळगाव शहर - ३१२
भुसावळ - ३०९
अमळनेर - २२८
रावेर - १२६
चोपडा- ११८
भडगाव - ९३
यावल - ९२
पारोळा- ८६
धरणगाव - ८४
जामनेर - ८३
जळगाव ग्रामीण- ५४
एरंडोल - ५१
पाचोरा- ४३
चाळीसगाव - १८
बोदवड- १४
मुक्ताईनगर - १४
बाहेरील जिल्ह्यातील- ०६