जिल्ह्यात पुन्हा ८१ कोरोना बाधित रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 07:00 PM2020-06-22T19:00:45+5:302020-06-22T19:00:56+5:30
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग हा थांबता थांबत नसून दिवसागणित कोरोना लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढत होताना ...
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग हा थांबता थांबत नसून दिवसागणित कोरोना लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढत होताना दिसून येत आहे. सोमवारी पुन्हा नवीन ८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहर व बोदवड प्रत्येकी २०, जामनेर १५, रावेर १०, धरणगाव ०७, जळगाव ग्रामीण ०४, अमळनेर ०३, चोपड, भडगाव प्रत्येकी ०१ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या २४८३ इतकी झाली आहे.
जळगाव शहरात बाधितांची संख्या अधिक
जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रशासनाचीही दमछाक होत आहे. पण जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाला पूर्णविराम न लागता, दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. काही दिवसापूर्वी शंभरावर कोरोना बाधित रूग्ण जिल्ह्यात आढळून आले. त्यातच बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही त्यामानाने समाधानकारक आहे. प्रकृती ठणठणीत रहावी अन् लवकरात लवकर सुधारणा व्हावी, म्हणून रूग्णांना योग धडे दिले जात असून परिणामी अनेकांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधित जळगाव शहरात आढळून आलेले आहेत. ४६४ ही बाधितांची संख्या असून यातील काहींनी कोरोनावर मात केली आहे. त्यापाठोपाठ भुसावळात ३६६, अमळनेर २६४, चोपडामध्ये १९४, रावेर १८२ तसेच पारोळामध्ये १६७ कोरोना बाधित व्यक्ती आढळून आली आहे. यांच्यावर कोविड कक्षात उपचार सुरू आहेत.