अंजली दमानियांविरुद्ध मुक्ताईनगरात दुसरा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:01 PM2018-06-13T13:01:17+5:302018-06-13T13:01:17+5:30

एकनाथराव खडसे यांनी दिली फिर्याद

Against Anjali Damania complaint | अंजली दमानियांविरुद्ध मुक्ताईनगरात दुसरा गुन्हा दाखल

अंजली दमानियांविरुद्ध मुक्ताईनगरात दुसरा गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे इतर पाच जणांचाही समावेश मुक्ताईनगर पोलिसात न्यायालयाचे आदेश सादर

मुक्ताईनगर, जि. जळगाव : बनावट दस्तावेज तयार करून कट रचणे, दस्तावेज चोरी व फसवणूक प्रकरणी अंजली दमानिया यांच्यासह सहा जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी स्वत: बुधवारी सकाळी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत महिन्याभरापूर्वी मुक्ताईनगर पोलिसांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार देऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने खडसे यांनी कोर्टात धाव घेतली होती. मंगळवारी मुक्ताईनगर न्यायालयात याबाबत तीन तास युक्तिवाद झाला. यावर न्यायालयाने २४ तासाच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यावर स्वत: खडसे यांनी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता मुक्ताईनगर पोलिसात न्यायालयाचे आदेश सादर केला. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अंजली दमानिया मुंबई, रोशनी राऊत मुंबई, गजानन मालपुरे, जळगाव, सुभाष परशुराम कुºहाटे मुंबई, सदाशिव व्यंकट सुब्रमन्यम मुंबई, चारमेन फनर्स मुंबई या सहा जणांचा समावेश आहे.
यापूर्वी खडसे यांनी अंजली दमानिया यांच्याविरुद्ध १९ एप्रिल रोजी कट रचल्याच्या वक्तव्यावरुन गुन्हा दाखल केला होता.

Web Title: Against Anjali Damania complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.