वृद्ध व केशरी कार्डधारक शासकीय धान्यापासून वंचित

By admin | Published: June 29, 2017 12:30 PM2017-06-29T12:30:42+5:302017-06-29T12:30:42+5:30

अन्नपूर्णा योजनेतील मोफत धान्य 8 महिन्यापासून तर केशरी कार्डधारकांचे तीन वर्षापासून धान्य बंद

Aged and capillary card holders are deprived of government grains | वृद्ध व केशरी कार्डधारक शासकीय धान्यापासून वंचित

वृद्ध व केशरी कार्डधारक शासकीय धान्यापासून वंचित

Next

 ऑनलाईन लोकमत

अमळनेर,दि.29 - शासनाने अन्नपूर्णा योजनेतील लाभाथ्र्याचे मोफत धान्य गेल्या 8 ते 10 महिन्यापासून बंद केल्याने 80 वर्षावरील वृद्ध निराधार होण्याची वेळ आली आहे. उर्वरित केशरी कार्डधारकांना 3 वर्षापासून धान्यच नसल्याने कुचकामी ठरली आहेत
शासनातर्फे अन्नपूर्णा योजनेंतर्गत 80 वर्षाच्या वरील व निराधार वृद्धांसाठी त्यांच्याकडून कोणतेही काम होऊ शकत नसल्याने 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ देण्याची योजना अंमलात आणली होती. मात्र गेल्या 8 ते 10 महिन्यापासून वृद्धांना अन्नपूर्णा योजनेंतर्गत धान्यच मिळत नाही. त्यामुळे वृद्धांचा शासनाने आधारही  काढून घेतल्याने ते ख:या अर्थाने निराधार झाले आहेत.  तालुक्यात 230 कार्ड धारक अन्नपूर्णा पासून वंचित झाले आहेत 
 अन्नसुरक्षा योजना लागू झाल्याने 59 हजार पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांचा प्राधान्य कुटुंब योजनेत सहभागी करून त्यांना स्वस्त धान्यचा लाभ देण्यात येत आहे. मात्र 60 हजार ते 1 लाख उत्पन्न घेणारे केशरी कार्ड 18467 आहेत. त्यांना उर्वरित केशरी कार्ड धारक म्हणून टाकण्यात आले आहे. गेल्या 3 वर्षापासून म्हणजे फेब्रुवारी 2014 पासून त्यांना धान्यचा लाभ मिळत नसल्याने केशरी कार्ड शिधा पत्रिका नसून निरूपयोगी ठरल्या आहेत. पांढ:या पत्रिका आणि उर्वरित केशरी यांच्यात रंगा व्यतिरिक्त कोणताच फरक राहिला नाही. शासनाने बीपीएल आणि अंत्योदय लाभाथ्र्याना 900 ग्राम साखर देऊ केली आहे मात्र त्याचे दर साडे 13 रुपयांवरून 15 रुपये व 15 वरून 20 रुपये केल्याने गरीबांना आर्थिक फटका बसत आहे.
 
अन्नपूर्णा साठी धान्य येत नाही. अन्नसुरक्षा योजना अंमलात आल्यामुळे मर्यादित लोकांना धान्य द्यावे लागणार होते म्हणून केशरी कार्डात 59 हजार र्पयत उत्पन्नाची मयार्दा घातली आहे. उर्वरित केशरी कार्ड धारकांना लाभ मिळत नाही  - प्रदीप पाटील, तहसीलदार अमळनेर

Web Title: Aged and capillary card holders are deprived of government grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.