जागा बळकावण्याच्या भीतीने जळगावात वृद्धाची आत्महत्या
By admin | Published: July 5, 2017 01:56 PM2017-07-05T13:56:55+5:302017-07-05T13:56:55+5:30
विष प्राशन करीत संपविली जीवनयात्रा. जिल्हाधिका:यांच्या नावे चिठ्ठी लिहून तिघांवर कारवाईची केली मागणी.
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.5 - कराराने दिलेले शेड भाडेकरुकडून बळकावण्याचा प्रय} होत असल्याच्या नैराश्यातून रमेश रतन विभांडीक उर्फ सोनार (वय 68 रा.पंचमुखी हनुमान मंदिर परिसर, जळगाव) यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केली. बुधवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. विभांडीक यांनी आत्महत्येपूर्वी जिल्हाधिका:यांच्या नावाने चिठ्ठी लिहिली असून त्यात छळ करणा:या तिघांवर कारवाई व्हावी असा उल्लेख केला आहे. दरम्यान, आत्महत्येस जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल करुन अटक करावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला.
रमेश रतन विभांडीक यांचे नेरी नाका स्मशानभूमीसमोर प्लॉट क्र.137/1-2 पत्र्याचे शेड आहे. हे शेड गेल्या पाच वषार्पासून अरुण प्रल्हाद कस्तुरे यांना गॅरेजसाठी 11 महिन्याचा करार करीत भाडय़ाने दिले आहे. त्यासाठी 5 हजार रुपये भाडे ठरले आहे. दरवर्षी कराराचे नुतनीकरण केले जात होते. आता करार संपून दहा महिने झाले होते, तरीही कस्तुरे शेड सोडायला तयार नव्हते व भाडेही देत नव्हते. त्यामुळे विभांडीक हे चिंतेत होते.
मंगळवारी घेतले घरात विष
मंगळवारी दुपारी 4 वाजता विभांडीक यांनी घरात विष घेतले. तोंडाला फेस येत असल्याचे मुलगा राहूल यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना बुधवारी सकाळी साडे सहा वाजता त्यांचा मृत्यू झाला.