शेतकरी कृती समितीचे आंदोलन भरकटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 04:49 PM2018-08-17T16:49:16+5:302018-08-17T16:49:30+5:30

The agitation of the Farmer Action Committee was overwhelmed | शेतकरी कृती समितीचे आंदोलन भरकटले

शेतकरी कृती समितीचे आंदोलन भरकटले

googlenewsNext


चोपडा, जि.जळगाव : चहार्डी, ता.चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे गेल्या वर्षाच्या गाळप हंगामातील उसाचे थकीत पैसे मिळावेत यासाठी अनेक आंदोलन करूनही पैसे मिळत नसल्याने शेतकरी कृती समितीतर्फे १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनी तहसील कार्यालयावर सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय समितीने घेतला होता, मात्र तसे न करता अनेक वेळा चर्चा विफल झाल्यामुळे आत्मदहनाचा निर्णय घेतल्यावरही पुन्हा तहसीलदारांकडे चर्चेला गेल्याने शेतकरी कृती समितीचे आंदोलन भरकटले आहे, असा सूर सर्वत्र व्यक्त होत आहे. चर्चेचा विषय नसताना चर्चेला कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस.बी. पाटील व शेतकरी गेलेच कसे? त्यामुळे आत्मदहनाचा विषय बाजूलाच राहिला.
तहसीलदार दीपक गिरासे व पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी शेतकºयांशी चर्चा करून आत्मदहन थांबविले.
ध्वजारोहण नंतर शेतकºयांची बैठक तहसीलदारांच्या दालनात झाली. बैठकीत चोसाकाने साखर आणि मोलॉसिस विक्री केली असूनही पाहिजे त्या प्रमाणात शेतकºयांंना रक्कम मिळालेली नाही, आम्हाला बाकीचे काही एक माहीत नाही, चोसाका संचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, त्यांच्या मालमत्ता जप्त करा आणि शेतकºयांचे पैसे द्या अशा संतप्त भावना शेतकºयांनी तहसीलदारांसमोर बोलून दाखविली. यावर योग्य तो निर्णय घेण्यासाठी प्रशासनाने शेतकºयांकडून २७ आॅगस्टपर्यंत मुदत मागितल्याने आत्मदहन आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे.

Web Title: The agitation of the Farmer Action Committee was overwhelmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.