वाघूरच्या पाण्यासाठी आंदोलनाची ठिणगी पेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 06:58 PM2017-09-18T18:58:32+5:302017-09-18T19:02:32+5:30
शेतक:यांनी केला भाजपा पदाधिका:यांवर प्रश्नांचा भडीमार : मुख्य अभियंत्यांनी दिले लेखी आश्वासन
ऑनलाईन लोकमत
नेरी ता.जामनेर,दि.18 : गेल्या अनेक वर्षापासून वाघुर नदीमधील पाणी हे कमानी तांडा येथील धरणातून परिसरातील दुस:या सात धरणांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे पहूर पासून ते नेरी र्पयतची वाघुर नदीचे पात्र कोरडे ठाक झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतीला पाणी मिळत नसल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सोमवार 18 रोजी नदीच्या पुलावर रास्तारोको आंदोलन केले.
कमानी तांडा येथील नदी पात्रात धरण तयार करण्यासाठी सन 1995 मध्ये पाणी अडवून ते पाणी इतर छोटय़ा धरणामध्ये वळवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. 2010 मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होवून सदरचे पाणी अडवले गेले. मात्र याचा परिणाम पहूर पासून नेरी र्पयत असलेल्या वाघुर नदीच्या काठाशी असलेल्या गावांवर होवू लागला. या ठिकाणची नदी पात्र कायमचे कोरडे ठाक राहून प्रचंड पाणी टंचाई भासू लागली. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊ लागला. शेतक:यांनी याबाबत लघुपाटबंधारे विभागातील अधिका:यांकडे व्यथा मांडली. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शेतक:यांनी आंदोलन पुकारले.
अजिंठा ते थेट वाघुर धरणात येईर्पयतचा मुख्यप्रवाह या नदीचा आहे. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने हा प्रवाह सुरळीत ठेवावा तसेच नदीला जास्तीचे पाणी आल्यास ते इतर धरणांनाकडे वळवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कमानी तांडा धरणातून परिसरातील शेरी, लोन््रढी, पिंपळगाव, मोतीआई, हिवरा नाला व पाळधीजवळील दोन अशा सात छोटय़ा बंधा:यात हे पाणी सोडले जाते.
भाजपा पदाधिका:यांजवळ व्यक्त केला संताप
आंदोलन सुरु असतांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, बाजार समितीचे सभापती तुकाराम निकम, पंचायत समितीचे माजी सभापती बाबुराव घोंगडे, पाळधी येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समाधान पाटील, पंचायत समितीचे सदस्य अमर पाटील दाखल झाले. तुकाराम निकम, बाबुराव घोंगडे यांच्यासह अनेकांनी भाषणे देखील दिले. मात्र आंदोलकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. भाजपा सत्तेत असताना कार्यकत्र्याना आंदोलन करावी लागत असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. आंदोलनात भराडी, सुनसगाव, देवपिंप्री, नेरी दिगर, नेरी बुद्रुक येथील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने यावेळी उपस्थित होते.
अधिका:यांनी दिले लेखी आश्वासन
लघु पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता एस.एफ.गावित यांनी आंदोलनकत्र्याची भेट घेतली. त्यांच्या सर्व मागण्या मान्य करीत तसे लेखी आश्वासन दिले. या आंदोलनामुळे दोन्ही बाजूच्या रहदारीचा खोळंबा झाला होता.
वाघुर नदीतील मुख्य प्रवाह जशाचा तसाच ठेवावा, नैसर्गिक पद्धतीने पाणी सोडले पाहिजे. ज्यावेळी नदीला महापूर किंवा जास्तीचे पाणी आल्यास त्यावेळी इतर धरणामध्ये हे पाणी सोडावे. त्यामुळे कमानी तांडा या धरणापासून पुढील इतर अनेक गावांमधील शेतक:यांचा प्रश्न मिटेल.
- भरत पाटील, शेतकरी, सुनसगाव.