आंदोलक आणि पदाधिकाºयांमध्ये बाचाबाची
By admin | Published: February 8, 2017 12:08 AM2017-02-08T00:08:00+5:302017-02-08T00:08:00+5:30
चाळीसगाव : अनधिकृत कामामुळे दुकानदारी अडथळा येत असल्याची कैफियत घेवून गेलेल्या दुकानदारांना पालिकेत योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पालिका गेटसमोर ७ रोजी सकाळी ‘कपडे काढा’ आंदोलन
चाळीसगाव : नगरपालिकेच्या अनधिकृत कामामुळे दुकानदारी अडथळा येत असल्याची कैफियत घेवून गेलेल्या दुकानदारांना पालिकेत योग्य प्रतिसाद न मिळाल्याने अचानक त्यांनी पालिका गेटसमोर ७ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान पालिकेचे गेट बंद करुन ‘कपडे काढा’ आंदोलन करीत खळबळ उडवून दिली. या दरम्यान पालिकेतील पदाधिकारी दाखल झाल्याने दुकानदार व त्यांच्यात बाचाबाची होवून पालिकेतील वातावरण चांगलेच तापले.
या प्रकाराबाबत दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, भडगाव रोडवरील एलआयसी आॅफिस जवळ जेसीबी मशीनने गटारीसाठी मोठी चारी खणली आहे, गेल्या सहा दिवसापासून कामाची स्थिती तशीच असल्याने येथील दुकानांमध्ये ये-जा करण्यासाठीचा रस्ता बंद झाला आहे, याचा परिणाम व्यवसायावर होवून मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत ६ रोजी नगरपालीकेला व्यावसायिकानी निवेदन देवुन चारीत पाईप टाकून गटारीचे काम पूर्ण करावे अशी मागणी केली होती. मात्र दखल न घेतल्याने ७-८ दुकानदारांनी ७ रोजी पालिका गाठली. याठिकाणी मुख्याधिकारी श्रीकुष्ण भालसिग व बांधकाम अभियंता राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन गटारीचे काम केव्हा होणार असल्याची विचारणा त्यांनी केली असता मुख्याधिकारी यांनी या कामाची कुठलीच माहिती नसल्याचे सांगताच दुकानदार संतप्त झाले. हे काम अनधिकृत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे असून पालीकेच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी दुकानदारांनी गेटसमोर समोरच कपडे काढा आंदोलन केले. ही बाब कानावर येताच पालिका सत्ताधारी गटनेते राजेंद्र चौधरी, भाजपा शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील आदी पदाधिकारी आंदोलन स्थळी आले. यावेळी पदाधिकाºयांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने दाखल झालेल्या पोलिसांसमोर आंदोलक व पदाधिकाºयांमध्ये बाचाबाची झाली. या दरम्यान घृष्णेश्वर पाटील यांनी संयमी भूमिका घेत तातडीने पाईप टाकण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलक शांत झाले.
या आंदोलनात खुशाल पाटील, पप्पू पाटील यांचेसह ७-८ दुकानदार सहभागी झाले होते. तसेच आंदोलनाला रयत सेनेचे गणेश पवार व पदाधिकाºयांनी पाठिंबा दर्शवत होणाºया अन्ययाबाबत पदाधिकाºयांना जाब विचारला आणि होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. (वार्ताहर)
पालिका मुख्याधिकारी दालनात भानुदास मराठे (भावडू), खुशाल पाटील, गणेश पवार व इतर चार ते पाच जणांनी अरेरावी करीत उर्मटपणाची भाषा वापरुन शिवीगाळ केली. नंतर मुख्याधिकार श्रीकृष्ण भालसिंग हे दालनातून निघून गेले. असता वरील सर्व व्यक्तीनीपालिकेचे मुख्य गेट बंद करुन ये- जा करणारे कर्मचारी व नागरिकांचा रस्ता अडविला. तसेच कर्मचाºयांना कोंडून ठेवले. अंगावरील कपडे काढून सार्वजनिक ठिकाणी लज्जास्पद वर्तन केले म्हणून चाळीसगाव पोलिसात वरील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पंजे करीत आहे.
आंदोलकांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न - राजेंद्र चौधरी
शहरातील एलआयसी कार्यालय परिसरातील गटार तुडुंब भरल्यामुळे रस्त्यावरुन पाणी वाहात होते. यामुळे दुर्गंधी पसरल्याने नागरिक हैराण झाले होते. त्यासाठी त्या गटारीचे काम सुरु केले होते. सुट्टी व आचारसंहितेच्या कामामुळे दोन दिवस पाईप उशीरा आले. आम्हाला विकासासाठी लोकांनी निवडून दिले आहे. केवळ राजकारण करुन कर्मचाºयांवर दहशत निर्माण करुन अर्धनग्न केलेला हा प्रकार पूर्णत: चुकीचा होता. विकासाचे काम करताना अशा प्रकारच्या कोणत्याही विरोधाला आम्ही घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया नगरपालिकेच्या सत्ताधारी गटाचे नेते राजेंद्र चौधरी यांनी आंदोलनाबाबत व्यक्त केली. तसेच नागरिकांनी चांगल्या कामांसाठी सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.