आमदारांबाबत आंदोलनकर्त्यांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:33 AM2019-03-01T00:33:56+5:302019-03-01T00:34:19+5:30
अमळनेर : पाडळसरे जनांदोलन समितीच्या आंदोलनाच्या १० व्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त करून ‘अमयनेरणा दोन दोन आमदार काय ...
अमळनेर : पाडळसरे जनांदोलन समितीच्या आंदोलनाच्या १० व्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त करून ‘अमयनेरणा दोन दोन आमदार काय कामना’ अशा घोषणा देत परिसर दणाणला तर रांगोळीकर नितीन भदाणे यांनी धरणासाठी वेळ पडल्यास देहत्याग करेल, असे जाहीर केले. माजी उपसभापती धनगर पाटील, प्रा.सुभाष पाटील, गावरान जागल्या मंचचे विश्वास पाटील यांनी ‘केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी’ असल्याची टीका केली.
आज सानेगुरुजी स्मारक कर्मभूमी, समस्त लाडशाखीय वाणी समाज पंच मंडळ, अहिर सुवर्णकार युनियन, दि.सोनार अँड सराफ असोसिएशन, राजपूत एकता मंच, इस्टेट ब्रोकर संघटना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पातोंडा, जुनोने येथील ग्रामस्थांनीही उपस्थित राहत पाठिंबा दिला. रंजाने गावच्या बचत गटांच्या महिला कार्यकर्त्या, बहुजन मुक्ती पार्टी, बांधकाम व्यावसायिक यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधीनी आंदोलनात दिवसभर सहभाग नोंदविला.