भुसावळ येथे अग्नि तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:21 AM2018-09-17T01:21:25+5:302018-09-17T01:23:44+5:30

लाखोंचे नुकसान : कलर पेंटच्या दुकानाला अचानक आग

 Agni orphan at Bhusawal | भुसावळ येथे अग्नि तांडव

भुसावळ येथे अग्नि तांडव

Next
ठळक मुद्देआगीमुळे शॉर्टसर्किट होऊ नये यासाठी प्रसंगावधान राखून लगेच वीजपुरवठा खंडित करण्यात आला. घटनेची माहिती मिळतात डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठेचे पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाले. तसेच राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते यांनाही घटनास्थळ गाठले व शक्य ते मदतकार्य केले.भुसावळ पालिकेचे चार अग्नी बंब येऊनही आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण असताना शेजारील तालुक्यातही घटनेची माहिती कळवूून तेथूनही अग्नी बंब पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.सलग दुसऱ्या दिवशी आग लागली आहे. १५ रोजी रेल्वे क्वार्टरमध्ये आग लागून नुकसान झाले होते.

भुसावळ, जि.जळगाव : येथील बाजारातील ब्राह्मण संघाच्या जवळ असलेल्या राजलक्ष्मी पेंट अ‍ॅण्ड डिस्ट्रीब्यूटरच्या दुकान व गोडावूनला आग लागल्याने यात लाखो रुपयांचे पॅण्ट जळून खाक झाले, ही घटना रविवारी रात्री दहा ते पावणे अकराच्या सुमारास घडली.
बाजारातील ब्राह्मण संघाजवळ असलेले चार मजली कलर पेंटचे दुकान व गोडावूनला अचानक आग लागली. यामध्ये दुकानातील लाखो रुपयांचे पेंटचे डबे जळून खाक झाले. पेंटच्या डब्यांमध्ये गॅस असल्यामुळे एखाद्या सिनेमाला शोभेल अशा पद्धतीचे आगीचे आकाशात दूरवर धुराचे लोट निघत होते. आगीने क्षणातच रुद्र रूप धारण करून दोन मजलेपर्यंत वेढले होते. ही घटना समजताच जवळच वाल्मीक नगरचे पैलवान पुत्र ग्रुपचे तरुण वर्ग तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच नगरसेवक निर्मल कोठारी यांनी पालिकेत अग्नीबंबाच्या विभागाला माहिती कळविली. क्षणातच चार अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले.
आगीचे मोठे लोणचे लोण पसरत असताना सभोवतालच्या रहिवाशांना याचा धोका निर्माण होऊ नये याकरिता त्यांना त्वरित घरातून बाहेर निघण्याचा व सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
रात्रभर सोशल मीडियावर आग कुठे लागली, किती नुकसान झाले? परिस्थिती कशी आहे? घटनास्थळी कोण आहे? कुणाला नुकसान तर नाही झाले? नेमकी कशामुळे आग लागली असेल अशा अनेक प्रश्नांची माहिती घेण्यासाठी रात्रभर सोशल मीडियावर संदेश पाठवले व चौकशी केली जात होती.









 

Web Title:  Agni orphan at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.