रुबू सर्जिकलमध्ये अग्नितांडव
By admin | Published: May 5, 2015 02:35 PM2015-05-05T14:35:43+5:302015-05-05T14:42:08+5:30
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसाठी मंगळवारी मतदान होणार आहे.
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात होणार्या या मतदान प्रक्रियेसाठी दोन पॅनलमध्ये लढत होणार असून त्यासाठी नेते मंडळींकडून सोमवारीही मोर्चे बांधणी सुरू होती.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची गेल्या महिना, दीड महिन्यापासून रणधुमाळी सुरू होती. या निवडणुकीसाठी सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान साहित्य वाटप सुरू झाले.
ही निवडणूक २१ संचालक निवडीसाठी होती. मात्र माघारीनंतर सहा उमेदवार बिनविरोध झाल्याने आता १५ जागांसाठी मतदान होणार आहे. बिनविरोध झालेल्यात भाजपा-शिवसेना युतीच्या सहकार पॅनलचे पाच तर राष्ट्रवादी कॉँग्रेस-कॉँग्रेसच्या शेतकरी पॅनलचा एक उमेदवार बिनविरोध झाला आहे.
१५ तालुक्यात मतदान
निवडणुकीसाठी १५ तालुक्यांधील तहसील कार्यालयांमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात मतदान प्रक्रिया होईल. १५ तालुक्यातून विविध गटांसाठी २८५६ मतदार मतदान करून उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. निवडणुकीसाठी नेते मंडळींकडून रात्री उशिरापर्यंत मोर्चे बांधणी सुरू होती.