जळगावात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींकडून ब्रोकरला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:57 PM2018-09-27T12:57:07+5:302018-09-27T12:57:45+5:30

Agricultural Produce Market Committee Chairman in Jalgaon suffers brutal bronchitis by the chairmen | जळगावात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींकडून ब्रोकरला बेदम मारहाण

जळगावात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींकडून ब्रोकरला बेदम मारहाण

Next
ठळक मुद्देतक्रारीचा रागगाळ्याबाबत ३० वर्षाचा करार

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी गाळ्यांची भाडे वाढ केल्याची तक्रार माजी मंत्री सुरेशदादा जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केल्याचा राग आल्याने बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर व अविनाश भालेराव यांनी ब्रोकर प्रकाश लालचंद जैन (रा.अयोध्या नगर, जळगाव) यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता एमआयडीसीतील गुरांच्या बाजार समोर घडली. दरम्यान, याप्रकरणी जैन व भालेराव यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला परस्परविरोधी तक्रार दिली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजता प्रकाश जैन हे घरी जात असताना गुरांच्या बाजार समोर बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील व संचालक वसंत भालेराव यांचा मुलगा अविनाश भालेराव हे कारमधून आले व तु आमच्याविरुध्द सुरेशदादा जैन यांच्याकडे तक्रार केली असे म्हणत शिविगाळ करुन मारहाण केली. या भांडणात हातातील सात ग्रॅमची सोन्याची अंगठी, गळ्यातील १२ ग्रॅमची सोन्याची साखळी गहाळ झाली तसेच अंगावरील कपडेही फाटले असे प्रकाश जैन यांनी तक्रारीत म्हटले आहे.
जैन यांनी कार अडविल्याची तक्रार
सभापती लक्ष्मण पाटील यांच्यागटाकडून अविनाश भालेराव यांनी तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, सभापती लक्ष्मण पाटील, उपसभापती मनोहर पाटील, अनिल भोळे, कैलास चौधरी व जितेंद्र मुंदडा असे कारने जात असताना रस्त्यात गाडी अडवून दुकानाचे भाडे का वाढविले म्हणून शिविगाळ करायला सुरुवात केली. त्यांना समजावून सांगत असताना भालेराव यांना मारहाण केली. त्यात धक्का लागल्याने जैन हे गटारीत पडल्याने त्यांच्या पायाला खरचटल्याचे म्हटले आहे.
काय आहे प्रकरण
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलातील गाळ्यात प्रकाश जैन यांचे कार्यालय आहे. या गाळ्याबाबत ३० वर्षाचा करार झालेला आहे. सुरुवातीला ५० रुपये महिना असे भाडे होते तर सध्या २२५ रुपये भाडे आकारले जात आहे. गेल्या महिन्यात दुकानांचे भाडे १ हजार २०० रुपये इतके करण्यात आल्याची नोटीस बाजार समितीने दुकानदारांना दिली. ही भाडे वाढ दुकानदारांना मान्य नसल्याने बाजार समितीचे सचिव तसेच माजी मंत्री सुरेशदादा जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदन दिले आहे.त्यावरुन हा वाद झाला.

Web Title: Agricultural Produce Market Committee Chairman in Jalgaon suffers brutal bronchitis by the chairmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.