कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:54+5:302021-06-25T04:12:54+5:30

भुसावळ : कृषी विभागातर्फे २१ जून ते १ जुलैपर्यंत कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला आहे. अंजनसोडे ...

Agriculture Revitalization Week by the Department of Agriculture | कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी सप्ताह

कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी सप्ताह

Next

भुसावळ : कृषी विभागातर्फे २१ जून ते १ जुलैपर्यंत कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला आहे. अंजनसोडे ता. भुसावळ येथील प्रगतशिल शेतकरी सुरेश बळीराम चौधरी यांच्या शेतात बीबीआयई (रुंद ओरंबा व सरी) यंत्राच्या सहाय्याने २३ एकर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी करून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.

तालुका कृषी अधिकारी रमण जाधव यांनी बहुउपयोगी बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे पेरणीचे फायदे व त्याचे उपयोग यांची माहिती शेतीशाळेतून गावातील शेतकऱ्यांना करून दिली. यावेळी गावातील प्रगतशिल शेतकरी व स्थानिक पदाधिकारी आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

१ जुलै रोजी हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिनाचे आयोजन करण्यात येणार असून, कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप होईल.

Web Title: Agriculture Revitalization Week by the Department of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.