औताला नातू व मुलाला जुंपणा:या बळीराजाला कृषीविभागाचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2017 05:36 PM2017-07-02T17:36:23+5:302017-07-02T17:36:23+5:30

लोकमत वृत्ताची दखल : कृषी अधिका:याच्या प्रयत्नाने रतनलाल बाफना यांनी दिली बैलजोडी

Agusta grandson and child solder: The help of agriculture department | औताला नातू व मुलाला जुंपणा:या बळीराजाला कृषीविभागाचा मदतीचा हात

औताला नातू व मुलाला जुंपणा:या बळीराजाला कृषीविभागाचा मदतीचा हात

Next

अशोक परदेशी/ऑनलाईन
भडगाव, दि.2 - भडगाव तालुक्यातील निंभोरा येथील शेतकरी हिरामण सुखदेव पाटील यांनी पैशाअभावी शेतीच्या मशागतीसाठी औताला नातू आणि मुलाला जुंपल्यानंतर संकटात सापडलेल्या बळीराजाला कृषी विभागाने मदतीचा हात पुढे करीत बैलजोडी उपलब्ध करून दिली आहे.
भडगाव तालुक्यातील निंभोरा येथील शेतकरी हिरामण सुखदेव पाटील या शेतक:याने गरीबीमुळे  परिवारातील सदस्यांच्या मदतीने वखर ओढत कपाशीची कोळपणी केली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्या प्रयत्नाने जळगावच्या रतनलाल सी. बाफना यांच्या गोशाळेतून या शेतक:याला 40 हजार रुपयाची बैलजोडी नुकतीच  देण्यात आली.
हिरामण पाटील (वय 72) यांचेकडे 1 एकर 37 गुंठे जमीन आहे. शेतीच्या कामासाठी बैलजोडीसाठी पैसे कोठून आणावे हा प्रश्न होता. यामुळे ते मुलगा प्रल्हाद व नातू उमेशसह स्वत: वखर ओढून कपाशीची वखरणी, आंतरमशागत, कोळपणीचे काम करायचे.  यामुळे कोळपणी व निंदणीचा दोन्हीचा खर्चही वाचत असे. तर बैलजोडीसाठी कर्ज घेतल्यास परिवाराचा गाडा कसा चालणार? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे ते स्वत: प्रचंड मेहनत घेत होते.  ते पत्नी, मुलगा, सून, दोन नातू असा परिवार असून  नातू उमेश हा पाचवीत शिकत आहे. या लहानशा  शेतात विहीर असून  कपाशीला ते ठिबक सिंचनने पाणी देतात.
अखेर बैलजोडी मिळाली..
‘ते स्वत:च ओढताहेत वखर’ असे वृत्त प्रसिध्द करुन  शेतक:याची ही  व्यथा ‘लोकमत’ने मांडली  होती. जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी या वृत्ताची दखल घेत निंभोरा येथे 30 जून रोजी शेतक:याची भेट घेवून पाहणी केली. सोबत  तालुका कृषी अधिकारी ए.व्ही.जाधव,  उपसंचालक जिल्हा अधीक्षक अनिल भोकरे, कृषी पर्यवेक्षक  मनोज सैंदाणे, कृषी सहायक अनिल देशमुख आदी उपस्थित होते. यानंतर  सोनवणे यांनी शाकाहारचे प्रणेते रतनलाल बाफना यांचेकडे शेतक:याची ही व्यथा मांडली. बाफना यांनी उदारतेने  40 हजार रुपयाची बैलजोडी या शेतक:यास घरपोच पोहचवली. तसेच कृषी विभागातर्फे अर्धे पोते ढेप व अर्धा पोते  मोफत दिले.  शासनस्तरावर याची दखल गेली नाही परंतु जिल्हा कृषी विभाग अधिका:यांच्या  प्रयत्नाने हिरामण पाटील यांच्या कुटुंबास अखेर बैलजोडी मिळाली.

Web Title: Agusta grandson and child solder: The help of agriculture department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.