अहिरवाडी फिडरला वारा व पावसाची झाली आहे अ‍ॅलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 04:01 PM2020-06-22T16:01:24+5:302020-06-22T16:02:26+5:30

संताप : वाघोड, कर्जोद व आहिरवाडीत अनेकदा होतो अंधार

Ahirwadi feeder is allergic to wind and rain | अहिरवाडी फिडरला वारा व पावसाची झाली आहे अ‍ॅलर्जी

अहिरवाडी फिडरला वारा व पावसाची झाली आहे अ‍ॅलर्जी

Next

रावेर : शहरातील १३२ केव्ही विद्युत केंद्रातून अहिरवाडी, कर्जोद व वाघोड गावांसाठी निघालेल्या स्वतंत्र फिडरवर वादळचं नव्हे तर हलका वारा वा पाऊस असला तरी रात्र रात्रभर वीजपुरवठा खंडित होत असल्याने, सदर फिडरला वारा व पावसाची अ‍ॅलर्जी झाली आहे का? अशी तीव्र नापसंती उभय ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.
एखाद्या वादळात वा विजांच्या कडकडाटात वीजपुरवठा खंडित झाल्यास वीज ग्राहकही परिस्थितीनुरूप तांत्रिक बिघाड लक्षात घेऊन संयमाने ते सहन करीत असतात. मात्र, हलक्या वाऱ्याची झुळूक वा पावसाच्या सरी जरी कोसळल्या तरी अहिरवाडी फिडरवरील वीजपुरवठा खंडित झाला तर तो रात्र रात्रभर खंडीतचं असतो. यामुळे वाघोड, कर्जोद व अहिरवाडी ही तिन्ही गावे अंधारात बुडत असल्याची शोकांतिका आहे. रावेर ते अहिरवाडी हे फिडर अंकलेश्वर - बºहाणपूर रोडलगत रहदारीच्या रस्त्यावर असतांना, सदर फिडर सातत्याने वीजपुरवठा खंडित होईल एवढे अतिसंवेदनशील कसे ? फिडरवरील वीजतारा वा अन्य सामुग्री जीर्ण झाली काय? असा सवाल संतप्त ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. तत्संबंधी उपकार्यकारी अभियंता प्रभुचरण चौधरी तथा सावदा विभागीय कार्यकारी अभियंता यांनी गांभीर्याने दखल घेऊन सदरची समस्या कायमची धसास लावावी अशी जोरदार मागणी होत आहे.
समस्या सोडवावी
अहिरवाडी फिडरच्या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणी वाघोडचे शिवसेना शाखा प्रमुख कमलेश पाटील व ग्रामस्यांनी केली आहे.

Web Title: Ahirwadi feeder is allergic to wind and rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.