बहिणीच्या स्मृत्यर्थ वातानुकूलित शवपेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 06:04 PM2019-08-28T18:04:08+5:302019-08-28T18:04:56+5:30

मोठ्या बहिणींच्या स्मृतिप्रीत्यर्थ लहान बहिणीने जुवार्डी ग्रामपंचायतीला भेट दिलेल्या वातानुकूलित शवपेटीचे जुवार्डी, ता.भडगाव येथे लोकार्पण करण्यात आले.

Air-conditioned coffin in memory of sister | बहिणीच्या स्मृत्यर्थ वातानुकूलित शवपेटी

बहिणीच्या स्मृत्यर्थ वातानुकूलित शवपेटी

googlenewsNext
ठळक मुद्देजुवार्डी येथे स्तुत्य उपक्रमलहान बहिणीचा आदर्श

गुढे, ता.भडगाव, जि.जळगाव : मोठ्या बहिणींच्या स्मृतिप्रीत्यर्थ लहान बहिणीने जुवार्डी ग्रामपंचायतीला भेट दिलेल्या वातानुकूलित शवपेटीचे जुवार्डी, ता.भडगाव येथे लोकार्पण करण्यात आले.
जुवार्डी येथील अर्चना पाटील यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले होते. अर्चनाच्या लहान बहिणी प्रतिभा जगताप रा.पुणे व सुचित्रा दरेकर रा.श्रीगोंदा, अहमदनगर यांनी जुवार्डी गावासाठी वातानुकूलित शवपेटीची गरज असल्याचे ओळखले. यामुळे मोठ्या बहिणीच्या स्मरणार्थ उत्तर कार्याच्या दिवशी जुवार्डी गावाला शवपेटी घेऊन देण्याचा संकल्प केला होता.
कोणत्याही प्रसंगात एखाद्याचा मृत्यू झाला आणि त्याचे नातेवाईक लांबचा प्रवास करून येईपर्यंत बराच कालावधी उलटतो अशावेळी शवपेटी गरजेची असते. प्रतिभा जगताप व सुचित्रा दरेकर यांना मोठ्या बहिणीच्या अंत्यविधीसाठी पुणे व अहमदनगरहून प्रवास करून यावे लागले व वातानुकूलित शवपेटीमुळे अर्चनाचा मृतदेह जास्त काळ सुरक्षित राहण्यासाठी मदत झाली होती. त्यावेळेला जुवार्डी गावासाठी वातानुकूलित शवपेटीची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. जुवार्डी गावात शवपेटी नसल्यामुळे बाहेरगावहून शवपेटी मागवावी लागत असे. काही वेळेला शवपेटी उपलब्ध होत नाही. ही गरज ओळखून शवपेटी भेट दिली. याबद्दल ग्रामस्थांनी प्रतिभा जगताप व सुचित्रा दरेकर ह्यांचे आभार मानले.
यावेळी राजेंद्र पाटील, माजी सरपंच व्ही.एस.पाटील, चाळीसगावचे भास्कर पाटील, अरुण निंब पाटील, विजय पाटील, धर्मराज पाटील, आजाबराव परशराम पाटील, रामा किसन पाटील, धामणगाव येथील निकम, नाचनवेल, ता.कन्नड येथील जि.प.सदस्य गणेश पाटील, ग्रामसेवक मुकेश चौधरी, ग्रापलिपिक रावासाहेब पाटील, भूषण पाटील, ग्रा.पं. सदस्य दादा मोरे, चंद्रशेखर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Web Title: Air-conditioned coffin in memory of sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.