एअर कुलरचे अद्ययावत तंत्रज्ञान विकसीत
By admin | Published: June 12, 2017 04:46 PM2017-06-12T16:46:55+5:302017-06-12T16:46:55+5:30
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्याथ्र्याचे संशोधन
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 12 - गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्याथ्र्यानी पाणी, वीज यांची बचत करून आद्र्रता नियंत्रीत करता येईल असे एअर कुलरचे अद्ययावत तंत्रज्ञान विकसीत केले आहे.
वातानुकूलित म्हणजेच एसीला पर्याय म्हणून एअर कुलरची क्रेझ सध्याच्या काळात वाढत आहे. परंतु पाण्याचा अपव्यय, वीजेचा अतिरीक्त वापर आणि काही कालावधीनंतर अनपेक्षित आद्र्रता वाढत असते. या बाबी लक्षात घेता गोदावरी अभियांत्रीकी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.व्ही.एच.पाटील व प्रा. मिलींद धनके यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम वर्षाचे विद्यार्थी अक्षय चिंचोले, सागर सुर्यवंशी, सागर सपकाळे, नीलेश गायकवाड, सचिन पाटील यांनी एअर कुलरचे अद्ययावत तंत्रज्ञान विकसीत केले आहे. विकसीत केलेले एअर कुलर हे साधारण कुलरच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. त्यात ‘पेल्टीय थर्मी इलेक्ट्रीक कपल’ चा तसेच ‘हनी कोम्ब’ पॅड्सचा उपयोग करून दुहेरी स्तरावर कुलींग करण्यात आली आहे. तसेच मायक्रोकंट्रोलरचा उपयोग करून पाण्याचा अपव्यय टाळणे व आद्र्रतेवर नियंत्रण मिळवणे आता या संशोधनामुळे सहज शक्य होणार आहे. या संशोधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, प्राचार्य डॉ. व्ही.जी.अराजपुरे, उपप्राचार्य प्रवीण फालक यांनी विद्याथ्र्याचे कौतुक केले आहे.