नाताळच्या सुट्यांमुळे अजिंठा लेणी हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 09:32 PM2018-12-26T21:32:45+5:302018-12-26T21:35:09+5:30

नाताळाच्या सुट्यांमुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसा पासून हजारो पर्यटकांनी लेणीला भेट दिल्याने शासनाच्या महसूलात वाढ झाली आहे.

Ajantha Caves Housefull due to Christmas holidays | नाताळच्या सुट्यांमुळे अजिंठा लेणी हाऊसफुल्ल

नाताळच्या सुट्यांमुळे अजिंठा लेणी हाऊसफुल्ल

googlenewsNext
ठळक मुद्देनाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दीपर्यटकांच्या गर्दीमुळे शासनाच्या महसूलात वाढ२५ हजार पर्यटकांनी दिली दोन दिवसात भेट

वाकोद,ता.जामनेर : नाताळाच्या सुट्यांमुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसा पासून हजारो पर्यटकांनी लेणीला भेट दिल्याने शासनाच्या महसूलात वाढ झाली आहे.
सध्या नाताळाच्या सुट्या सुरू असल्याने पर्यटकांनी अजिंठा लेणीला पसंती दिली आहे. गेल्या दोन दिवसात सुमारे २५ हजार पर्यटकांनी लेणीला भेट दिल्याने पर्यटन विकास महामंडळाची कार पार्किग व व्हिजीटर सेंटर ची पार्किग फुल्ल झाली होती. २५ बसेस, १ हजार कार व १५० दुचाकी तर काही खाजगी बसने पर्यटक लेणी पाहण्यासाठी आले होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पर्यटकांच्या सोयीसाठी १६ बसेस, १६ चालक, १२ वाहक, २ सुपरवायझर, २ मार्ग तपासणी अधीकारी तैनात केले होते. तर सोयगाव आगार प्रमुख एच.जी. ठाकरे याठिकाणी दिवसभर थांबुन होते. त्यानंतरही पर्यटकांना बससाठी रांगा लावाव्या लागल्या. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने १३ कर्मचारी पर्यटकांना सुविधा देन्यासाठी तैनात कले होते. फर्दापूर पोलीस स्टेशनतर्फे पर्यटकांची सुरक्षा व गैरसोय होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता.

Web Title: Ajantha Caves Housefull due to Christmas holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.