कर्जमाफी होत नाही तोपर्यत संघर्ष सुरुच राहणार : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2017 02:22 PM2017-04-16T14:22:50+5:302017-04-16T14:22:50+5:30
जोर्पयत शेतक:यांची कर्जमाफी होत नाही तोर्पयत हा संघर्ष सुरुच राहील असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी रविवारी केले
Next
अमळनेर,दि.16- शेतक:यांना ताठ मानेने उभे राहता यावे व त्यांचा 7/12 कोरा व्हावा यासाठी हा संघर्ष सुरू आहे. जोर्पयत शेतक:यांची कर्जमाफी होत नाही तोर्पयत हा संघर्ष सुरुच राहील असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी रविवारी अमळनेर येथील सभेतदरम्यान केले .
शेतकरी संघर्ष यात्रेनिमित्त अमळनेर येथे झालेल्या सभेस व्यासपीठावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अरुणभाई गुजराथी, जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, आमदार डॉ.सतीश पाटील,नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर उपस्थित होते.
या निगरगठ्ठ शासनाला काही घेणं-देणं नाही
आपल्या 10 मिनिटांच्या भाषणात त्यांनी शासनाने सडकून टीका केली.ते म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे.मात्र कुठलीही कामे झाली नाहीत.जळगाव जिल्ह्याला महत्वाची खाती मिळालेली असतांना पाडळसे धरणाचे काम संथगतीने सुरू आहे, उपसा सिंचन योजना बंद आहेत.काही मागणी केली की थातुरमातुर उत्तरे दिली जातात. या निगरगठ्ठ शासनाला शेतक:यांशी काही घेणे-देणे नाही. उत्तर प्रदेश सरकार शेतक:यांना कर्जमाफी देऊ शकते तर महाराष्ट्र सरकार का देत नाही असाही सवाल त्यांनी केला.
शेतकरी राजा पेटून उठ
शेतकरी राजा जीवन एकदाच मिळते. आपण गप्प बसलो तर शासन आपल्या डोक्यावर मिरे वाटेल. आपल्या हक्कासाठी शेतकरी राजा पेटून उठ असे भावनिक आवाहन त्यांनी केले.कांद्याला 1 रुपयांचे अनुदान जाहीर करुन शेतक:यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या शासनाने केले आहे. 1 रुपयात चहा तरी मिळतो का? असे ते म्हणाले.
प्रास्तविक अॅड.ललिता पाटील यांनी तर सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले.