जळगावातील हाफकिन अजिंठा फार्मास्युटीकल्स तीन दिवसात सुरु होणार - गिरीश बापट यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:00 PM2018-06-15T12:00:36+5:302018-06-15T12:00:36+5:30

दोन वर्षानंतर कंपनी सुरू होणार असल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण

Ajitha Pharmaceuticals in Jalgaon will start in three days - Girish Bapat's information | जळगावातील हाफकिन अजिंठा फार्मास्युटीकल्स तीन दिवसात सुरु होणार - गिरीश बापट यांची माहिती

जळगावातील हाफकिन अजिंठा फार्मास्युटीकल्स तीन दिवसात सुरु होणार - गिरीश बापट यांची माहिती

Next
ठळक मुद्देकंपनीत झाली आढावा बैठकनवीन कामगार भरती नाही

जळगाव : गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेली जळगाव येथील हाफकिन अजिंठा फार्मास्युटीकल्स लि. ही महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली कंपनी तीन दिवसात पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी जळगाव येथे दिली. दरम्यान, या निर्णयामुळे कंपनीच्या कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून आपल्या विविध मागण्या मान्य होण्याचीही अपेक्षा कामगारांमधून केल्या जात आहे.
गुुरुवारी गिरीश बापट हे जळगाव दौऱ्यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत कंपनीमध्ये आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
औषध विक्रीतील स्पर्धा व इतर कारणांमुळे गेल्या दोन वर्षांपासून जळगाव येथील हाफकिन अजिंठा फार्मास्युटीकल्स लि. ही कंपनी बंद पडलेली आहे. त्यामुळे कामगारांवरही बेकारीची कुºहाड कोसळली आहे. महाराष्ट्र शासनाच उपक्रम असलेली ही कंपनी पुन्हा सुरू करण्यासंदर्भात कामगारांनी वेळोवेळी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला.
त्यानंतर गिरीश बापट हे जळगाव दौºयावर आले असताना त्यांनी कंपनीला भेट देऊन तेथेच आढावा बैठक घेतली. या वेळी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक संपदा मेहता, संचालक सुभाष शंकरवार, महाव्यवस्थापक जी.पी. सुपे, गुणवत्ता नियंत्रक कर्णिक, निर्मिती विभाग प्रमुख एस.के. रोकडे, तुषार चौधरी आदी अधिकारी उपस्थित होते.
पाऊण तास चालली बैठक
पाऊण तास चाललेल्या या बैठकीत गिरीश बापट यांनी कंपनीची स्थिती जाणून घेत आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली. या सोबतच कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी मोठ्या रकमेची गरज असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांनी बैठकीतूनच संपर्क साधून ५० लाखाचा निधी मिळण्याविषयी मागणी केली.
कंपनीची केली पाहणी
बैठकीनंतर गिरीश बापट यांनी अ‍ॅप्रॉन घालून कंपनीची पाहणी करून यंत्रसामग्रीबाबत माहिती जाणून घेतली. तब्बल २० ते २५ मिनिटे कंपनीतील विविध विभागांना त्यांनी भेट देऊन पाहणी केली.
स्पर्धेमुळे आल्या अडचणी
औषधी विक्रीमध्ये वाढत्या स्पर्धेतून अडचणी येत होत्या. त्यामुळे कंपनी बंद अवस्थेत होती. यामध्ये कंपनी तयार करीत असलेल्या श्वान व सर्पदंशावरील एका लसची किंमत १०० रुपये तर इतर कंपन्यांची लस ७५ रुपयांना येते. मात्र ‘हाफकीन’ची एकच लस गुणकारी ठरते तर इतर लस या दोन वेळा घ्याव्या लागतात. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या औषधीला पसंती असल्याने ही कंपनी पुन्हा सुरू होतअसल्याचेबापटयांनीपत्रकारांशीबोलतानासांगितले.
निविदेची आवश्यकता नाही
पूर्वी विविध लस खरेदीसाठी निविदा काढाव्या लागत होत्या. मात्र सरकारचा उपक्रम असलेल्या ‘हाफकिन’कडेच आता या निविदा राहणार असल्याने निविदा प्रक्रियेची गरज राहणार नसल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले.
४१ प्रकारच्या औषधी इतरही राज्यांना पुरविणार
कंपनीकडे ७१ प्रकारच्या औषधांची यादी असून यातील ४१ प्रकारच्या औषधी या कंपनी तयार करणार असून त्या महाराष्ट्र सरकारला पुरविल्या जातील. या सोबतच इतरही राज्यांना औषधी देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे बापट यांनी सांगितले.
मशिनरी अद्ययावत
कंपनीतील संपूर्ण मशिनरी दोन दिवसात अद्यायावत करण्यात आल्या असून दोन ते तीन दिवसात कंपनी सुरू होणार असल्याचे बापट म्हणाले.
पैशांच्या अडचणीवर करणार मात
कंपनी सुरू होत असली तरी पैशांची अडचण असल्याचेही बापट म्हणाले. यासाठी ५० लाखाची मागणी पालकमंत्र्यांकडे केल्याचेही त्यांनी सांगितले. सोबतच मुख्यमंत्र्यांनाही यासाठी गळ घाळणार असल्याचे ते म्हणाले. सध्या सात कोटींची आवश्यकता असून ते वेगवेगळ््या मार्गाने उभे केले जातील असेही त्यांनी शेवटी सांगितले.
चर्चेतून कामगारांचे प्रश्न सोडवू
कंपनीच्या कामगारांचे काही प्रश्न असून त्या संदर्भात संघटना संपर्कात असून त्यांचे प्रश्न सोडविले जातील, अशीही ग्वाही बापट यांनी दिली. कर्मचाºयांच्या प्रश्नांसंदर्भात न्यायालयात याचिका आहे, त्या त्यांनी मागे घ्याव्या अन्यथा त्यांचा रोजगार जावू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र त्यांचा रोजगार जावू द्यायचा नसून चर्चेतून त्यांचे प्रश्न सोडवू असेदेखील ते म्हणाले.
नवीन कामगार भरती नाही
कंपनी सुरू होत असली तरी नवीन भरती केली जाणार नसून पूर्वीचे जे कामगार होते, त्यांनाच प्रथम प्राधान्य दिले जाईल, असेही बापट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कर्मचाºयांच्या सहाव्या वेतन आयोगाबाबत समिती तयार केली जाणार असून त्यातून मार्ग काढला जाईल, असे बापट म्हणाले.
कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण
कंपनी पुन्हा सुरू होणार असल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातवरण आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे कामगारांनी सांगितले.
बंद बाबत संचालकांवर आरोप
जेनेरिक औषधी उत्पादन करणारी ही कंपनी बंदबाबत बोलताना अजिंठा कामगार युनियनच्या पदाधिकाºयांनी सांगितले की, स्वयंघोषित संचालकांनी व अधिकाºयांनी सरकारला चुकीची माहिती दिल्याने कंपनी बंद पडली. यामुळे कामगारांचे नुकसान झाल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. या विषयी संघटनेच्यावतीने गिरीश बापट यांना निवेदनही देण्यात आले.

Web Title: Ajitha Pharmaceuticals in Jalgaon will start in three days - Girish Bapat's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.