अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही भाजपाची मांडलिक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:27 PM2017-12-26T12:27:29+5:302017-12-26T12:30:21+5:30
अभाविपचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत साठे
सुशील देवकर / ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 26- अभाविप ही भाजपाची विद्यार्थी विंग असल्याचा समज आहे. मात्र ते चुकीचे असून अभाविप ही भाजपाची किंवा भाजपा ही अभाविपची मांडलिक नाही. दोन्ही स्वतंत्र व स्वायत्त संघटना असल्याचे प्रतिपादन अभाविपचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत साठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
अभाविपने या अधिवेशनात संस्कारक्षम व रोजगाराभिमुख शिक्षण ही थीम घेतली आहे. याआधीच्या अधिवेशनांची फलश्रुती कितपत झाली? असे विचारले असता प्रा.डॉ.साठे म्हणाले की, दर अधिवेशनात थीम असते असे नाही. अभाविपची स्थापना 1969 मध्ये झाली. 67 वर्षापासून काम सुरू आहे. प्रांत अधिवेशन 52वे आहे. अधिवेशन काळात प्रतिनिधींना, विद्याथ्र्याना वर्षभरातील कामाची दिशा मिळते. रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे, तसेच विद्याथ्र्यानीही स्वत:मधील कौशल्य विकसित करून, रोजगार मिळविण्यासाठी पात्र व्हावे, यादृष्टीने यंदाची थीम निवडली आहे. अभाविपने या आधीच्या काळात सातत्याने विद्याथ्र्यामध्ये एकता निर्मितीचा प्रय} केला. त्यात यशस्वी झालो असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारविरोधात नाराजी व्यक्त होते, मात्र अभाविप ही भाजपाचीच विंग समजली जाते? या प्रश्नावर ते म्हणाले की, हे मान्य नाही. अभाविप ही भाजपाची मांडलिक नाही. दोन्ही स्वतंत्र संघटना आहेत. वैचारिक एकता असू शकते, किंबहुना आहे. मात्र संघटनेचे अस्तित्व स्वतंत्र आहे. अभाविपतून बाहेर पडल्यानंतर कोणी कुठे जावे, हा त्याचा प्रश्न आहे. काही जण भाजपात गेले म्हणून भाजपाची विंग, असे होत नाही.
अभाविपच्या कार्याचे वैशिष्टय़ काय? या प्रश्नावर ते म्हणाले की, सेवा, संस्कार व संघर्ष या तीन मूल्यांवर अभाविपचे काम सुरू आहे. विश्वासार्हता व सातत्य यावर अभाविप टिकून आहे. विद्याथ्र्यापुढे अनेक प्रलोभने आहेत. त्यापासून त्यांनी दूर रहावे, यासाठी अभाविप प्रय} करते. त्यामुळेच राज्यात व देशातही अभाविपची ताकद वाढते आहे. मागच्या वर्षी 32 लाख विद्याथ्र्यानी अभाविप सदस्य म्हणून नोंदणी केली. त्यामुळे जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना ठरली आहे.