अकोला-को-ऑप बँकेचे होणार जळगाव पीपल्स बँकेत विलीनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:18 AM2021-09-27T04:18:30+5:302021-09-27T04:18:30+5:30

नेरी नाका येथील यशवंतराव मुक्तांगण सभागृहात झालेल्या सभेला बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, व्हा. चेअरमन डॉ. प्रकाश कोठारी, संचालक डॉ. ...

Akola-Co-Op Bank to merge with Jalgaon People's Bank | अकोला-को-ऑप बँकेचे होणार जळगाव पीपल्स बँकेत विलीनीकरण

अकोला-को-ऑप बँकेचे होणार जळगाव पीपल्स बँकेत विलीनीकरण

Next

नेरी नाका येथील यशवंतराव मुक्तांगण सभागृहात झालेल्या सभेला बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, व्हा. चेअरमन डॉ. प्रकाश कोठारी, संचालक डॉ. सी.बी. चौधरी, स्मिता पाटील, प्रा. विलास बोरोले, सुनील पाटील, रामेश्वर जाखेटे, चंदन अत्तरदे, राजेश परमार, प्रवीण खडके, ज्ञानेश्वर मोराणकर, एमडी सीईओ दिलीप देशमुख, तज्ज्ञ संचालक जे. एम. अग्रवाल, तरल शहा, व्यवस्थापन मंडळ सदस्य संजय पाटील, भूषण चौधरी, निर्णय चौधरी यांच्या बँकेचे इतर अधिकारी-कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

या सभेत दिलीप देशमुख यांनी मागील सभेचे इतिवृत्त तसेच विषय सूचीचे वाचन केले. त्यानंतर अनिकेत पाटील यांनी आर्थिक वर्षातील कामकाजाचा व आर्थिक परिस्थितीचा अहवाल सादर केला. यात मार्च २०२१ अखेर बँकेच्या ठेवी रु. १६०२ कोटी व कर्ज ८९९ कोटी असून एकूण व्यवसाय रु. २५०२ कोटी इतका असल्याचे सांगितले. तसेच खातेधारकांसाठी आरोग्य विमा योजना उपलब्ध करून दिली असल्याचीही माहिती दिली. बँकेचे संचालक चंदन अत्तरदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Web Title: Akola-Co-Op Bank to merge with Jalgaon People's Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.