भरमसाठ शुल्क वाढीच्या विरोधात विद्यापीठावर 'आक्रोश मोर्चा'

By सागर दुबे | Published: August 29, 2022 08:24 PM2022-08-29T20:24:30+5:302022-08-29T20:24:40+5:30

विद्यापीठामार्फत सुमारे ४० ते ७० टक्के पर्यंत शुल्क वाढ करण्यात आलेली आहे

'Akrosh Morcha' on university against huge fee hike | भरमसाठ शुल्क वाढीच्या विरोधात विद्यापीठावर 'आक्रोश मोर्चा'

भरमसाठ शुल्क वाढीच्या विरोधात विद्यापीठावर 'आक्रोश मोर्चा'

Next

जळगाव :  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने विविध अभ्यासक्रमांच्या शुल्कामध्ये भरमसाठ वाढ केली आहे. या वाढीच्या विरोधात सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे विद्यापीठावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजींनी विद्यापीठ परिसर दणाणून गेले होते.

विद्यापीठामार्फत सुमारे ४० ते ७० टक्के पर्यंत शुल्क वाढ करण्यात आलेली आहे. या शुल्क वाढीचा फटका  सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ही अन्यायकारक शुल्कवाढ तातडीने कमी करावी व विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी अभाविपतर्फे विद्यापीठावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भारत माता की जय, वंदे मातरम, कुलगुरू हमे पढने दो, देश को आगे बढने दो... अशा जोरदार घोषणाबाजी अभाविपच्या कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी केली. प्रांत मंत्री अंकिता पवार हिने विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यानंतर प्रभारी कुलसचिव यांना विविध मागणींचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी विभाग संयोजक कल्पेश सोनवणे, प्रांत शोध कार्य संयोजक अश्विन सुरवाडे, जिल्हा संयोजक मयूर माळी, महानगर मंत्री रितेश महाजन, चैतन्य बोरसे, नितेश चौधरी, भूमिका कानडे, पवन बावस्कर, हंसराज चौधरी, चेतन नेमाडे, प्रीतम निकम , वैभवी ढिवरे, मोनाली जैन, मनीष चव्हाण, योगेश अहिरे, आदित्य चौधरी आदी उपस्थित होते.
 

Web Title: 'Akrosh Morcha' on university against huge fee hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव