अकुलखेडय़ाच्या आरोपीला सात वर्ष शिक्षा
By admin | Published: July 15, 2017 04:55 PM2017-07-15T16:55:03+5:302017-07-15T16:55:03+5:30
विळ्याचा धाक दाखवित केला होता जबरी बलात्कार. अमळनेर जिल्हा न्यायालयाने दिला निर्णय
Next
ऑनलाईन लोकमत
अमळनेर, दि.15 - चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे हातातील विळ्याचा धाक दाखवत बळजबरीने शेतात नेऊन बलात्कार करीत अंगावरील दागिने काढून घेतल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्या.दिनेश कोठलीकर यांनी आरोपी रवींद्र दिनकर पाटील याला सात वर्ष व दंडाची शिक्षा सुनावली
अकुलखेडा येथे 22 मे 2016 रोजी पीडित महिला गुरांना चारापाणी करीत होती. आरोपी रवींद्र दिनकर पाटील याने पीडित महिलेला हातातील विळ्याच्या धाक दाखवत घरामागे शेतातील पाटचारी नेले. या ठिकाणी दारूच्या नशेत तिच्यावर बलात्कार करीत अंगावरील सोन्याचांदीचे दागिने काढून घेतले. या प्रकरणी पीडित महिलेने 23 मे 2016 रोजी चोपडा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपासाधिकारी सुजित ठाकरे व उपनिरीक्षक कैलास वाघ यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील राजेंद्र चौधरी यांनी 13 साक्षीदार तपासले. त्यानुसार न्यायालयाने आरोपी रवींद्र दिनकर पाटील याला कलम 376 प्रमाणे 7 वर्ष शिक्षा व 15 हजार रु दंड व कलम 392 प्रमाणे 3 वर्ष शिक्षा व 5 हजार रु दंड व कलम 354 प्रमाणे 2 वर्ष अशी एकत्र सात वर्षे शिक्षा व 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. आरोपीने लुटलेले दागिने व दंड पीडित महिलेस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.