निम येथे विठू नामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:11 AM2021-07-22T04:11:42+5:302021-07-22T04:11:42+5:30
विश्वस्त व भाविकांनी आदल्या दिवशी तापी जल आणून मंदिर गाभाऱ्यापासून संपूर्ण परिसर धुवून काढला. आषाढी एकादशीला पहाटे पाच वाजता ...
विश्वस्त व भाविकांनी आदल्या दिवशी तापी जल आणून मंदिर गाभाऱ्यापासून संपूर्ण परिसर धुवून काढला. आषाढी एकादशीला पहाटे पाच वाजता सामाजिक अंतर राखत विठ्ठल रखुमाई मूर्तींना दुग्ध स्नान घालून, चंदन, पुष्प लेप चढविणेत आला. विविध सुगंधी पाना-फुलांनी मंदिर सजविण्यात आले. विठ्ठलाचे भक्त हेमंत कैलास चौधरी यांच्या हस्ते विधिवत महा पूजन करण्यात आले. विठ्ठल... विठ्ठल... जयहरी विठ्ठल... या निनादात मंदिर दुमदुमले. दरवर्षाचे मानकरी भादू सोमा कोळी यांनी ध्वजस्तंभारोहण केले. काकडा आरतीनंतर मंदिराच्या सभा मंडपात वारकरी मंडळींनी ज्ञानदेव... तुकारामाच्या गजरात वारकरी ठेका धरला.
मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मास्कसह गावातील मंडळींनी रांगेने विठ्ठल - रखुमाईचे दर्शन घेतले. संध्याकाळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत गावातून पालखी निघाली. घरोघरी महिलांनी पालखीचे स्वागत केले. रात्री सभा मंडपात वारकरी मंडळाने भजनावली गायिली. मंदिराचे अध्यक्ष मगन वामन पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
----
२२सीडीजे३