बंद शाळेचे आवार बनला मद्यपींचा अड्डा
By Admin | Published: February 6, 2017 12:55 AM2017-02-06T00:55:57+5:302017-02-06T00:55:57+5:30
पारोळा : परिसराचा होतोयं दुरुपयोग, पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
पारोळा : एकेकाळी ज्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी रांगा लागत त्या शाळा विद्याथ्र्याअभावी बंद पडल्या आहेत. शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी पुरेसे प्रय} झालेले नाही. त्यामुळे ओस पडलेल्या शाळांच्या इमारतीच्या परिसराचा दुरुपयोग होऊ लागला आहे.
पारोळा शहरात महामार्गाला लागून असलेल्या परिसरात जिल्हा परिषद मराठी मुलांची केंद्रीय शाळा क्रमांक एक व मुलींची शाळा क्रमांक एक अशा दोन स्वतंत्र कौलारू इमारती सर्व सोयीयुक्त अशा बांधण्यात आल्या होत्या. दोन्ही शाळा मिळून जवळपास 25 ते 30 खोल्या आहेत. लोकवर्गणीतून गतकाळात या शाळेच्या इमारतीला रंगरंगोटी करून, बोलके चित्र काढून शाळेच्या दोन्ही इमारती सुसज्ज केल्या होत्या.
आपल्या पाल्यांना या शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पालक आग्रही होते. एकेकाळी दोन्ही शाळा मिळून 400 ते 500 विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेत. याच शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन तालुक्यात अनेक लोकप्रतिनिधी घडले आहे.
परंतु गेल्या चार ते पाच वर्षापासून या दोन्ही शाळांना घरघर लागली. दोन्ही शाळांची पटसंख्या शून्य झाली. पटसंख्या शून्य करण्यामागे काहींचा हेतू हा जरूर वेगळा होता. परंतु पटसंख्येअभावी या दोन्ही शाळांना थेट कुलूप लावण्याची वेळ आली.
विद्यार्थी-शिक्षकांअभावी दोन्ही शाळांच्या इमारती ओस पडल्या. याचाच फायदा घेत मराठी मुलींच्या शाळा क्रमांक एकच्या परिसराचा वापर काही लोक शौचालयासाठी करू लागले. या लोकांना कोणी बोलणारे नसल्याने हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. या मराठी शाळेच्या इमारतीच्या आवाराला संरक्षण भिंत नसल्याने महामार्गालगत असलेल्या व्यावसायिकांनी या जागेचा उपयोग करीत आपली दुकाने वाढवित या सरकारी जागेवर अतिक्रमण केले आहे. एकेकाळी ज्ञानदानाचे पवित्र काम येथे होत होते; पण इमारती ओस पडल्याने शौचालयासाठी त्याचा वापर केला जात आहे.
जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा क्रमांक एकची इमारत एका खासगी मराठी शाळेला भाडेतत्त्वावर कराराने देण्यात आली आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने या शाळेच्या इमारतीच्या चौफेर कालीपिली प्रवासी वाहतूक करणारे वाहने उभी राहतात. पोलिसांची मूक संमती या अवैध प्रवासी वाहतूक वाहनांना असल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ येथे असते. या दोन्ही इमारतींची वेळीच देखभाल व काळजी घेणे महत्त्वाचे आहे. नाही तर एके दिवशी येथे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती होत्या असे सांगण्याची वेळ येईल. या ओसाड इमारतीच्या व्हरांडय़ात काही जण अंधाराचा फायदा घेत मद्यपान करतात. (वार्ताहर)
शहरातील जिल्हा परिषदेच्या या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची झुंबड उडायची. शाळेत दर्जेदार शिक्षण मिळायचे. याच ठिकाणी शिक्षण घेऊन अनेक जण मोठय़ा हुद्यावर पोहचलेले आहे.
4मात्र गेल्या काही वर्षात इंग्रजी शाळांकडे पालकांचा वाढलेला कल, जि.प. प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष यामुळे या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत होत ती शून्य झाली. विद्याथ्र्याअभावी शाळाच ओस पडली. या शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रय}ांची गरज आहे.
जि.प.शाळेच्या इमारतीच्या सभोवती संरक्षण भिंत घालण्याचा प्रस्ताव जि.प.कडे पाठवणार आहे. या शाळेत विद्यार्थी जास्तीत जास्त कसे प्रवेश घेतील याकडे लक्ष देऊन दोन्ही शाळांना गतवैभव प्राप्त करून देऊ
-डॉ.भावना भोसले,
गटशिक्षणाधिकारी, पारोळा