वादळ, वारे येऊन गेल्यानंतर ‘किसान ॲप’चा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:47+5:302021-06-24T04:12:47+5:30

वाघडू, ता. चाळीसगाव : शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी, म्हणून शेतकऱ्यांसाठी किसान ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या माध्यमातून ...

Alerts for 'Kisan App' after storms and winds | वादळ, वारे येऊन गेल्यानंतर ‘किसान ॲप’चा अलर्ट

वादळ, वारे येऊन गेल्यानंतर ‘किसान ॲप’चा अलर्ट

googlenewsNext

वाघडू, ता. चाळीसगाव : शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी, म्हणून शेतकऱ्यांसाठी किसान ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या माध्यमातून शेती हवामानाची माहिती संदेशाद्वारे दिली जाते. त्याचा काही प्रमाणात शेतकऱ्यांना फायदाही होतो. पण गेल्या काही दिवसांपासून देण्यात येणारे संदेश हे वेळ गेल्यानंतर येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, अतिवृष्टी, वातावरण याची माहिती, पाणी पिकावरील रोगराई, त्यासाठी नियोजन आदी माहितीचे संदेश दिले जातात. ही माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या ॲपद्वारे दिले जाणारे संदेश दोन-तीन दिवस उशिरा मिळत आहेत. गेल्या आठवड्यात तालुक्यात व जिल्ह्यात वादळी वारे व काही ठिकाणी पाऊस पडला. प्रत्यक्षात काही ठिकाणी वादळी वारे येऊन गेल्यानंतर दोन दिवसांनी हा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आला.

किसान ॲपवर काय माहिती मिळते?

किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित सर्व माहिती मिळते. हवामान, अतिवृष्टी, हवामानाची माहिती ॲपद्वारे उपलब्ध होत असल्याने हवामान पाहून शेतकरी कामाचे नियोजन करीत आहेत. पीक पाणी, पिकासाठी रोगराई याविषयीदेखील माहिती मिळत असल्याने यादृष्टीने पिकाचे रक्षण करण्यास मदत होते. हवामान, रोगराई यासह आवश्यक सर्वच माहिती मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा बराच फायदा होत आहे. अपडेट वेळेत मिळावे, तंत्रज्ञानाचे युग असल्याने कोणतीही माहिती वेळेत मिळणे अपेक्षित आहे. पूर्वी मोबाईल व इतर साधने नसल्याने माहितीसाठी अधिकाऱ्यांच्या भेटी घ्याव्या लागत होत्या. मात्र आता तंत्रज्ञानामुळे माहिती अपडेट होणे आवश्यक आहे.

वारा, वादळ याविषयी माहिती उपलब्ध होण्यास तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बाजारपेठदेखील उपलब्ध होते. यामुळे त्यांचीही माहिती अपडेट असावी. माहिती उशिरा मिळते. सध्या तंत्रज्ञानाचे युग असून त्याचा उपयोग सर्व जग करते. शेतकरीदेखील आता तंत्रज्ञानाचा वापर करीत असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या ॲपद्वारे माहिती वेळेत उपलब्ध व्हावी, ॲपद्वारे वेळेत माहिती मिळाल्यास शेतकरी सावध होतो.

- काकासाहेब पाटील, वाघडू.

किसान ॲपद्वारे मिळणारे संदेश शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून येणारे संदेश उशिरा प्राप्त होत आहेत.

- अमोल पाटील, उपसरपंच, रोकडे.

आज घरबसल्या शेतातील मोटार चालू-बंद करू शकतो आणि तंत्रज्ञान विकसित झाले आहे. असे असताना ॲपवर माहिती म्हणजे माहिती अपडेट केली जात नसावी, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शासनाने याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.

- सुनील पवार, भाजप युवा मोर्चा, तालुकाध्यक्ष

Web Title: Alerts for 'Kisan App' after storms and winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.