जळगावातील वाघूर धरणाचे सर्व २० दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:55 PM2019-10-27T12:55:34+5:302019-10-27T12:56:11+5:30
धरण झाल्यापासून प्रथमच उघडण्यात आले सर्व दरवाजे
जळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरात त्अकाली आलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले असून वाघूर नदीच्या उगमस्थली झालेल्या दमदार पावसामुळे जळगावातील वाघूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे रविवारी सकाळी या धरणाचे सर्व २० दरवाजे उघडण्यात आले. धरणातून ३३४३८ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे़ सततच्या ढगाळ वातावरण व रिमझीम पडणाऱ्या या पावसामुळे पिके अक्षरश: सडायला लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे़ आतापर्यंत जिल्हाभरात १३३ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़
८० ते ८५ टक्के ज्वारीचे नुकसान
मध्यतंरीच्या कालखंडात उन पडल्यानंतर ज्यांनी ज्यांनी ज्वारी काढली होती़ त्यांची पंधरा ते २० टक्के ज्वारी हाती लागली असून ८० ते ८५ टक्के ज्वारीचे पूर्णत: नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे़ यासह कपाशीला प्रथमच कोंब फुटण्याचे प्रकार होत आहे़ कपाशीची ५ लाख १० हजार हेक्टरवर लागवड होती़ यातील हलक्या जमीनीवरी कपाशीने तग धरला मात्र काळी जड जमिनीवरील कपाशीचे पूर्णत: नुकसान झाले आहे़ चारा पूर्णत: नष्ट झाला आहे़ यासह सोयाबीन व अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे़
आॅक्टोबरमध्ये पावसाची धूम
ऐरव्ही आॅक्टोबर हिटचा अनुभव घेणाºया जिल्हावासीयांना यंदा आॅक्टोबरमध्ये पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे़
आॅक्टोबरच्या अखेरीस झालेला हा अवकाळी पाऊस पिकांसाठी धोकादाक ठरला़ हा पाऊस नसता तर समाधानकारक उत्पन्नाची अपेक्षा होती़ आता पर्यंत जिल्हाभरात १३३ टक्के पाऊस झाला आहे़