धुळीने माखले सारे शेतशिवार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 10:48 PM2019-12-07T22:48:00+5:302019-12-07T22:48:13+5:30

जळगाव-औरंगाबाद महामार्ग । शेतकरी वर्ग हैराण, उत्पादनावरही परिणाम

All the farmers in the dust ... | धुळीने माखले सारे शेतशिवार...

धुळीने माखले सारे शेतशिवार...

Next


पाळधी, ता. जामनेर : परिसरातून जात असलेल्या जळगाव औरंगाबाद महामार्गाचे गेल्या दोन वर्षभरापासून चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. पाळधी ते पहुर रस्त्याचे खोदकाम करून ठेवलेले असुन महामार्गावरून येणाऱ्या - जाणाºया लहान , मोठ्या वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. रस्त्यावरील मातीतून वाहन गेले की लगेच धुळीचे लोट उठून नजीकच्या शेतातील पिकांवर बसून पिकांना याचा फटका बसत आहे.
तसेच ये - जा करणाºया वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यालगतच्या अनेक शेतकऱ्यांची कपाशी, तुरी, मिरची, हरभरा, दुबारे मका पिके धुळीने माखल्याचे दृश्य दिसत असते.
यामुळे धुळीने वाहनधारक तसेच शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या एक ते दोन वर्षभरापासून नेरी, पाळधी, पहुर व वाकोदपर्यत महामार्गाचे काम हे संथ गतीने चालू आहे. पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे परंतु या रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने तेथेही मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट तयार होऊन रस्त्यावर बर्याच लांबपर्यत धुळ पसरली जाते.
यावेळी आसपासच्या शेतकºयांच्या शेतमालावर धुळ साचली जाते यामुळे येथील रस्त्यालगतच्या शेतातील कपाशी सह इतर पिकांचे मोठे नुकसान होत असून वाहनधारकही धुळीने त्रस्त झाले आहेत.
कपाशीवर साचलेल्या काळपट धुळीने कापूस वेचणीसाठी तयार होत नाहीत. यामुळे कापुस वेचणी करणेही अवघड झाले आहे.
पिकांची वाढ खुंटली
तसेच रब्बी पेरणीनंतर उगवलेला मका, हरभरा, गहू, ज्वारी या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत असुन धुळीच्या परिणामाने हीे पीके धोक्यात आली आहेत.

 

 

Web Title: All the farmers in the dust ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.