शनिवारी झाल्या चारच फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:16 AM2021-04-25T04:16:19+5:302021-04-25T04:16:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शुक्रवार प्रमाणे शनिवारीही जळगाव आगारात प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे चारच फेऱ्या झाल्या. बस मध्ये ५० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शुक्रवार प्रमाणे शनिवारीही जळगाव आगारात प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे चारच फेऱ्या झाल्या. बस मध्ये ५० टक्के प्रवाशी क्षमता असतांनाही यातील निम्मे प्रवाशी देखील प्रवास करताना आढळून आले नाहीत.
संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे सध्या जिल्हा अंतर्गतच अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा सुरू आहे. तसेच या बसेस मध्येही शासनाच्या सूचनेनुसार शुक्रवार पासून ५० टक्केच प्रवाशी आसन क्षमता निश्चित करण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारी पहिल्या दिवशी जळगाव आगारातून बाहेरगावी रवाना झालेल्या बसेसमध्ये ५० टक्के क्षमतेनुसार २२ प्रवाशीही बसलेले आढळून आले नाही. तर शनिवारीही जळगाव आगारात धुळे दोन फेऱ्या,भुसावळ व जामनेर येथे झालेल्या फेऱ्या मध्येंही बोटावर मोजण्या इतकेच प्रवाशी प्रवास करताना आढळून आले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.