मुंबईकडून येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 01:00 PM2019-08-05T13:00:43+5:302019-08-05T13:04:01+5:30

प्रवाशांचे हाल : अकोला व नागपूरकडे जाणारे प्रवासी स्टेशनवर ताटकळले

All incoming trains from Mumbai canceled | मुंबईकडून येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द

मुंबईकडून येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द

Next

जळगाव : मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे रविवारी रेल्वे प्रशासनाने मुंबईकडून भुसावळकडे येणाºया दिवसभरातील सर्व गाड्या रद्द केल्या. भुसावळकडून मुंबईकडे जाणाºया गाड्याही ४ ते ५ तास विलंबाने धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. विशेष म्हणजे रविवारी सकाळच्या सत्रातील मुंबईहून जळगावला एकही गाडी न आल्यामुळे प्रवाशांना घराकडे परतावे लागले.
गेल्या आठवड्यातच मुंबईतील पावसामुळे अप आणि डाऊन मार्गावरच्या सर्व गाड्या चार ते पाच तास विलंबाने धावल्या होत्या. यामुळे मुंबईकडे जाणा-या प्रवाशांना स्टेशनवरच ताटकळत बसावे लागले होते. ही घटना ताजी असतानाच रविवारी मुंबईकडुन येणा-या सर्व गाड्यांचा खोळंबा झाला.
मुंबईहून मध्यरात्री सुटणाºया आणि सकाळच्या सत्रातील सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. रविवारी मुंबईकडुन येणारी एकही गाडी न आल्यामुळे अकोला व मनमाडकडे जाणाºया प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
तसेच दुसरीकडे जळगावहून मुंबईकडे जाणा-या गाड्याही विलंबाने धावत होत्या. बहुतांश गाड्या ईगतपुरी व नाशिकपर्यंत धावल्या. यामुळे मुंबईकडे जाणा-या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
हुतात्मा एक्सप्रेससह भुसावळ-मुंबई पॅसेंजरही आज रद्द
मुंबईतील पावसामुळे भुसावळ रेल्वे प्रशासनाने ५ आॅगस्ट रोजी अप आणि डाऊनची भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस रद्द केली आहे. तसेच भुसावळ-मुंबई पॅसेंजर, अमरावती एक्सप्रेस व तुलसी एक्सप्रेस या गाड्या सोमवारीही रद्द करण्यात आल्या आहेत.
सेवाग्राम एक्सप्रेस नाशिकहून माघारी
नागपूर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस रविवारी मुंबईला न जाता, नाशिकपर्यतच धावली. तर हीच गाडी नागपूरकडे जाण्यासाठी नाशिकहूनच माघारी फिरुन नागपूरकडे रवाना झाली. तर मुंंबई-जबलपूर व दुरंतो एक्सप्रेसही नाशिकपर्यंत धावली. तसेच मुंबई- हावडा एक्सप्रेस मनमाडपर्यंत व जनता एक्सप्रेस देवळालीपर्यंत धावली.

१)मुंबई लखनऊ पुष्पक एक्सप्रेस
२)मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेस
३) गोरखपूर काशी एक्सप्रेस
४) लोकमान्य टिळक कामाख्या
५) लोकमान्य टिळक भागलपूर
६)गोरखपूर गोदान एक्सप्रेस
७) दरंभागा पवन एक्सप्रेस
८)वाराणसी कामायनी एक्सप्रेस
९)लोकमान्य टिळक गोरखपूर
१०) मुंबई हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस
११) कानपूर उद्योगनगरी एक्सप्रेस
१२) सुलतान पूर सुपरफास्ट एक्सप्रेस
१३) मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस
१४) मुंबई अमरावती एक्सप्रेस
१५) मुंबई फिरोजपूर पंजाब मेल
१६) मुंबई नागपूर दूरंतो एक्सप्रेस
१७) मुंबई हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस
१८) मुंबई हावडा व्हाया अलाहाबाद
१९) लोकमान्य टिळक शालिमार
२०) गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस


 

Web Title: All incoming trains from Mumbai canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.