भुसावळ येथे मध्य रेल्वेचा अखिल भारतीय हिंदी नाट्य महोत्सव सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 10:32 PM2018-11-18T22:32:53+5:302018-11-18T22:33:42+5:30
रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांची साहित्याला वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने तसेच हिंदी भाषेत आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने रेल्वे बोर्डाद्वारा येथील रेल्वच्या विभागीय प्रशिक्षण संस्थेत रेल्वे प्रशासनातर्फे नाट्य महोत्सवास १८ रोजी प्रारंभ करण्यात आला.
भुसावळ, जि.जळगाव : रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांची साहित्याला वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने तसेच हिंदी भाषेत आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने रेल्वे बोर्डाद्वारा येथील रेल्वच्या विभागीय प्रशिक्षण संस्थेत रेल्वे प्रशासनातर्फे नाट्य महोत्सवास १८ रोजी प्रारंभ करण्यात आला. २० रोजी समारोप होईल.
हिंदी नाट्य महोत्सवाचे उद्घाटन डीआरएम आर.के.यादव, रेल्वे बोर्डाचे निर्देशक (राजभाषा) के.पी.सत्यानंदन, सहाय्यक निर्देशक नीरू पटणी, सहाय्यक निर्देशक मीना चावला, मुख्यालय उपमहा प्रबंधक बिपीन पवार, एडीआरएम मनोज सिन्हा, क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रदीप हिरडे यांच्या हस्ते दीपप्रज्वालन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
प्रसंगी डीआरएम आर.के.यादव म्हणाले की, रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच हिंदी भाषेमधील नात्याविषयी अधिक आवड निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये नाटकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नाटकामुळे समाजप्रबोधन होण्यास मदत मिळणार आहे. नाट्यमहोत्सवात विविध प्रकारचे एकाहून एक नाटकांचे सादरीकरण होणार आहे. नाट्य महोत्सवाचा रेल्वे कर्मचारी तथा नागरिकांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे मंडल प्रबंधक आर.के.यादव यांनी केले आहे.