जेसीआयमधून सर्वांगीण नेतृत्व तयार होते -खासदार उन्मेश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 06:44 PM2020-01-05T18:44:43+5:302020-01-05T18:45:39+5:30

जेसीआय ही सर्वांगीण नेतृत्व घडविणारी संस्था असल्याचे मत केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु-मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टॅण्डिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश पाटील यांनी शनिवारी येथे व्यक्त केले आहे.

All leadership is created from JCI - Officer Umesh Patil | जेसीआयमधून सर्वांगीण नेतृत्व तयार होते -खासदार उन्मेश पाटील

जेसीआयमधून सर्वांगीण नेतृत्व तयार होते -खासदार उन्मेश पाटील

Next
ठळक मुद्देदेशातील छत्तीसगड, ओरिसा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासह महाराष्ट्रातील १४० क्लब अध्यक्षांची कार्यशाळेला उपस्थितीसहा, नऊ आणि तेरा झोनमधील अध्यक्षांची कार्यशाळेचे उदघाटन

भुसावळ, जि.जळगाव : एखाद्या सामाजिक कामासाठी अनेक संस्था संघटना काम करतात. मात्र विविध विषयांसाठी काम करणारी जेसीआयमध्ये मलादेखील काम करण्याची संधी मिळाली. २०११ मध्ये अध्यक्ष असताना स्पिच क्राफ्ट कार्यशाळा आयोजित केली. त्यामुळे राज्य आणि राज्याबाहेर मोठा मित्र परिवार जोडता आला. जेसीआयच्या विविध उपक्रमातून अनेक पदाधिकारी घडले. जेसीआय ही सर्वांगीण नेतृत्व घडविणारी संस्था असल्याचे मत केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु-मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टॅण्डिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश पाटील यांनी शनिवारी येथे व्यक्त केले आहे.
भुसावळ वरणगाव हायवेवरील एका हॉटेलमध्ये आयोजित महाराष्ट्रासह पाच राज्यातील अध्यक्षांच्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना खासदार पाटील बोलत होते. व्यासपीठावर दीपा पटेल, डॉ.नीलेश झंवर, अनुपम तिवारी, मनोज चांडक, निर्मल मुणोत, अजय शर्मा, वालुरी श्रीनिवासन, नीलेश देशमुख, आमदार संजय सावकारे उपस्थित होते.
खासदार पाटील पुढे म्हणाले की, आजची कार्यशाळा येणारे वर्षभराचे नियोजन करण्यासाठी आहे. स्वत:ला झोकून काम केले तर आपल्याकडे राज्य पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले जाणार आहे. मीदेखील जेसीआय अध्यक्ष असताना वर्षभर नवनवे उपक्रम राबविले होते. त्यातून कमी वेळेत लाखो लोकांपर्र्यत पोहचता आले.

Web Title: All leadership is created from JCI - Officer Umesh Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.