यावल तालुक्यातील निमगाव-टेंभी ग्रा.पं.चे सर्व सदस्य अपात्र, ग्रामपंचायतीचा कर भरणा वेळेवर न केल्याचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 05:40 PM2018-11-18T17:40:47+5:302018-11-18T17:41:43+5:30
यावल तालुक्यातील नऊ सदस्य संख्या असलेल्या निमगाव-टेंभी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह सर्व नऊ सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कर भरणा वेळेवर न केल्याने जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी संपूर्ण सदस्यांना अपात्र ठरविले आहे.
यावल, जि.जळगाव : तालुक्यातील नऊ सदस्य संख्या असलेल्या निमगाव-टेंभी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह सर्व नऊ सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कर भरणा वेळेवर न केल्याने जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी संपूर्ण सदस्यांना अपात्र ठरविले आहे. ग्रामपंचायतीच्या रक्षकांनीच कराचा भरणा वेळे केला नसल्याची बाब पंचायत समीतीच्या वतीने करण्यात आलेल्या नियमीत दप्तर तपासणीत उघड झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील निमगाव टेंभी ग्रुप ग्रामपंचायतीत नऊ सदस्य संख्या आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी पंचायत समितीच्या वतीने करण्यात आलेल्या नियमीत दप्तर तपासणीत सरपंच उज्ज्वला प्रदीपसिंह पाटील, उपसरपंच प्रमोद हरिदास तावडे, सदस्य रूपाली दिलीप चौधरी, निशा शेखर तायडे, कविता धनराज तावडे, संजय चंद्रकांत तावडे, कविता संजय तावडे, दिलीप कडू पाटील व उज्ज्वला वीरंद्र्रसिंग पाटील या नऊ सदस्याना ग्रामपंचायतीच्या थकबाकीचे देयक मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत कर भरणा करावयास पाहिजे होता, मात्र सदस्यांनी मुदतीत कर भरणा केला नसल्याचे आढळून आल्याने ग्रामपंचायतीला देणे असलेला कर मुदतीत भरणे अपेक्षित होते. मात्र, सदस्यांनी कर वेळत भरला नसल्याचे तपासणीत आढळून आल्याचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी सांगितले. पंचायत समितीने मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सदस्यांच्या थकबाकीचा अहवाल सादर केला होता.
जिल्हाधिकाºयांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम १४ (ह) प्रमाणे निमगाव-टेंभी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह नऊ सदस्यांना अपात्र केले आहे. जिल्हाधिकाºयांच्या या निर्णयाने ग्रामपंचायत क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. तालुक्यात अजून किती ग्रामपंचायतींच्या सदस्यांनी वेळेवर कर भरणा केला नाही यासंदर्भातही शासनाने कारवाई करावी, असा सूरही ग्रामस्थांमध्ये उमटत आहे.