१०० कोटीवरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वपक्षीय एकटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:52 PM2020-02-03T12:52:51+5:302020-02-03T12:53:00+5:30

जळगाव : नगरोथ्थान अंतर्गत मंजूर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीवर राज्यशासनाने लावलेली स्थगिती उठविण्यासाठी मनपातील सत्ताधारी व विरोधक एकटवले ...

All parties united to raise the postponement of Rs 1 crore | १०० कोटीवरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वपक्षीय एकटवले

१०० कोटीवरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वपक्षीय एकटवले

Next

जळगाव : नगरोथ्थान अंतर्गत मंजूर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीवर राज्यशासनाने लावलेली स्थगिती उठविण्यासाठी मनपातील सत्ताधारी व विरोधक एकटवले आहेत.
शनिवारी महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह भाजपा, सेनेच्या नगरसेवकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेवून मनपाला मंजूर असलेल्या १०० कोटी रुपयांची स्थगिती उठविण्याची मागणी केली. त्यावर पालकमंत्र्यांनीही याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी मनपा स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, भाजप महानगरप्रमुख दीपक सुर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी हे देखील उपस्थित होते. या निधीला स्थगिती दिल्यामुळे अनेक महत्वपूर्ण कामांना ‘ब्रेक’ लागला आहे.

२५ कोटीला मुदतवाढीची मागणी
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या २५ कोटी रुपयांची खर्चाची मुदत संपली आहे. या निधीलाही मुदतवाढ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.१७ रोजी मुख्यमंत्री जिल्ह्याचा दौऱ्यावर येणार असून यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे यावेळी ठरले.नवीन आयुक्तांच्या नावाबाबत देखील यावेळी चर्चा झाली.

Web Title: All parties united to raise the postponement of Rs 1 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.