सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 09:49 PM2018-12-02T21:49:50+5:302018-12-02T21:52:34+5:30

युती सरकारने मराठा आरक्षण सवार्नुमते जाहीर केले तसेच धरणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करुन प्रयत्न केल्यामुळे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा रविवारी सर्व पक्षीय सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

All-party felicitation of Minister of State for Co-operation Gulabrao Patil | सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार

googlenewsNext
ठळक मुद्देमराठा आरक्षण व धरणगाव तालुका दुष्काळीसाठी केले प्रयत्नधरणगाव येथे झाला सत्काराचा कार्यक्रमसर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

धरणगाव : युती सरकारने मराठा आरक्षण सवार्नुमते जाहीर केले तसेच धरणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करुन प्रयत्न केल्यामुळे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा रविवारी सर्व पक्षीय सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
येथील भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालयात झालेल्या कार्यक्रमात कॉग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील व राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य डी.आर.पाटील, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्तविक माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांनी केले. यावेळी व्हॉलीबॉलच्या विद्यापीठ संघात निवड झाल्याबद्दल नेहा प्रकाश पाटील, रुचिता प्रकाश मराठे यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर डॉ.मिलींद डहाळे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, धानोरा सरपंच भगवान महाजन, मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी, बिलखेडा येथील भदाणे गुरुजी, नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, माध्य.शिक्षक पतपेढीचे संचालक शरदकुमार बन्सी, जिल्हा संघटक अ‍ॅड.शरद माळी, नगरसेवक भागवत चौधरी, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, वाल्मिक पाटील, आर.एच.पाटील, नंदु पाटील, योगेश पाटील, नगरसेवक अजय चव्हाण, सुरेश महाजन, संघटक धीरेंद्र पुरभे, चेतन जाधव, बुट्या पाटील, राहुल रोकडे, जयेश महाजन उपस्थीत होते. सुञसंचालन अ‍ॅड.शरद माळी यांनी तर आभार प्रकाश पाटील यांनी मानले.

Web Title: All-party felicitation of Minister of State for Co-operation Gulabrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.